आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दीपिका बर्थडे स्पेशल:कंडोमपासून ते ड्रग्जपर्यंत... वादात अडकले आहे दीपिकाचे नाव,  हे वाद कळल्यानंतर तुम्ही व्हाल शॉक्ड!

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दीपिकाचे नाव अनेकदा वादात अडकले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आज अर्थातच 5 जानेवारीला आपला वाढदिवस साजरा करत आहे. अभिनयापासून ते अफेअरपर्यंत आणि इतर बातम्यांमुळे ती नेहमीच चर्चेत राहिते. दीपिका आता बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. मात्र अलीकडेच ती ड्रग्ज प्रकरणात नाव समोर आल्याने चर्चेत होती. यापूर्वीही ती वादांत अडकली आहे. एक नजर टाकुया दीपिकाशी निगडीत काही वादांवर...

2020 मध्ये समोर आले ड्रग्ज प्रकरणात नाव
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणाचा उलगडा झाला होता. यात दीपिका पदुकोण हिचे नावदेखील समोर आले होते. बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक तारे-तारकांशी जुळलेल्या ‘क्वान टॅलेंट मॅनेजमेंट’ कंपनीची कर्मचारी करिश्मा प्रकाश या तरुणीच्या चौकशीतून दीपिकाचा ड्रग्जशी संबंध असल्याचे समोर आले होते. एनसीबीने दीपिकाला समन्स जारी केले होते. दीपिकाचे 28 ऑक्टोबर 2017 रोजीचे चॅट समोर आले होते. त्यात दीपिकाने करिश्मा प्रकाशसोबत ड्रग्जसंदर्भात चर्चा केली होती. त्यात दीपिकाने हॅश आणि वीड या शब्दांचा वापर केला होता. माल आहे का? असा प्रश्न तिने करिश्माला विचारला होता. त्यावर करिश्माने हो असे उत्तर दिले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, या व्हॉट्सअॅप ग्रुपची अॅडमिन स्वतः दीपिका होती. काही महिन्यांपूर्वीच हा ग्रुप डिलीट करण्यात आला असून यात इंडस्ट्रीतील 12 लोक अॅड होते. रिपोर्ट्सनुसार, एनसीबीच्या हवाल्याने दावा केला जातोय की, दीपिकाने एका विशिष्ट प्रकारची सिगारेट ओढल्याचे कबूल केले आहे.

छायाचित्रावरुन उठले होते वादंग
2014 मध्ये एका इंग्रजी वृत्तपत्राने वृत्तपत्राने दीपिकाच्या आक्षेहार्प अवस्थेतील छायाचित्रावर टिप्पणी केली होती. त्यानंतर दीपिकानेही 'हो मी स्त्री आहे. मला स्तन आहेत. तुम्हाला काही आक्षेप आहे का?', असे सांगत संबंधित वृत्तपत्राविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला होता. यावरुन बरेच वादंग उठले होते.

रणबीर कपूरला कंडोम गिफ्ट करणार असल्याचे म्हटले होते
दीपिका 'कॉफी विथ करण' (KWK)च्या तिस-या पर्वात आली होती. त्यावेळी तिचे रणबीरसोबत ब्रेक-अप झालेले होते. यावेळी दीपिका पदुकोण आणि सोनम कपूर यांनी रणबीरची खिल्ली उडवली होती. रणबीर दोन्ही अभिनेत्रींच्या जवळची व्यक्ती होती. या शोमध्ये दीपिकाला करणने विचारले, की तू रणबीरला कोणती भेट देऊ इच्छितेस? यावर तिने म्हणाली होती, रणबीरला मी कंडोमचे पाकिट देऊ इच्छिते. तो कंडोमचा खूप वापर करतो. तिच्या या वक्तव्याची त्यावेळी बरीच चर्चा रंगली होती.

लव्ह लाइफमध्ये मिळाली लोकप्रियता
दीपिका जेव्हा मुंबईला आली होती, तेव्हा निहार पांड्याने तिला सर्वाधिक मदत केली होती. ती निहारच्या घरातील सदस्याप्रमाणे बनली होती, बॉलिवूडमध्ये एंट्री मिळाल्यानंतर दीपिकाने निहारला सोडून दिले. त्यानंतर युवराज सिंह, रणबीर कपूर आणि सिध्दार्थ माल्या तिच्या आयुष्यात आले. मात्र, काही वर्षे रणवीर सिंहसोबत रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोन वर्षांपूर्वी दोघांनी लग्न केले.

सिध्दार्थला किस करून मिळवली होती लोकप्रियता
दीपिकाच्या आयुष्यात सिध्दार्थ माल्या युवराज सिंहनंतर आला होता. हा तिचा तिसरा बॉयफ्रेंड होता. सिध्दार्थ आणि दीपिका IPLदरम्यान सोबत दिसले होते. एका सामन्यादरम्यान दीपिका सिध्दार्थची टीम RCB (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु)ला चीअरअप करत होती. या सामन्यात सिध्दार्थची टीम विजयी झाली, तेव्हा दीपिकाने सिध्दार्थला खुलेआम किस केले होते.

कतरिना कैफमुळे आली चर्चेत
कतरिनाची रणबीरसोबतची बिकिनीमधील छायाचित्रे समोर आली होती, तेव्हा दीपिकाने तिच्यावर निशाणा साधला होता. दीपिका कतरिनाला इशा-यामध्ये म्हणाली होती, की लपून-छपून छायाचित्रे काढण्यात काय अर्थ आहे. सेलिब्रिटीला आपल्या खासगी आयुष्याची काळजी स्वत: घ्यावी लागते. सार्वजनिक ठिकाणी आपल्या वागणूकीवर लक्ष द्यायले हवे.

बातम्या आणखी आहेत...