आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

400 कोटी ब्रँड व्हॅल्यू असलेली दीपिका:366 कोटी नेटवर्थसह पती रणवीरच्याही पुढे, तिचे नाक कापण्यासाठी ठेवले होते बक्षीस

लेखक: ईफत कुरैशीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आज दीपिका पदुकोणचा 37 वा वाढदिवस आहे. दीपिका अभिनेत्री आहे. तिचे वडील प्रकाश पदुकोण यांना तिला बॅडमिंटनपटू बनवायचे होते. मात्र दीपिकाने स्वतःचा वेगळा मार्ग निवडला आणि मॉडेलिंगमध्ये करिअर केले. 2007 मध्ये रिलीज झालेल्या ओम शांती ओम या चित्रपटात मलायका अरोराच्या शिफारशीने फराह खानने तिला शाहरूख खानच्या अपोझिट कास्ट केले. तेव्हापासून ते आतापर्यंत 15 वर्षांच्या करिअरमध्ये दीपिकाने 37 चित्रपटांत काम केले आहे आणि तिने 52 पुरस्कार स्वतःच्या नावे केले आहेत. सध्या दीपिका पठाण चित्रपटातील बेशरम रंग गाण्यात परिधान केलेल्या भगव्या बिकिनीमुळे वादात आहे. यापूर्वी 2018 मध्ये पद्मावत चित्रपटात महाराणी पद्मावतीच्या भूमिकेमुळए तिला जीवे मारण्याची आणि नाक कापण्याची धमकी मिळाली होती. मात्र याचा तिच्या प्रसिद्धीवर काहीही परिणाम झाला नाही. आज दीपिकाची ब्रँड व्हॅल्यू 400 कोटी आहे आणि 366 कोटींच्या नेटवर्थसह कमाईच्या बाबतीत ती पती रणवीस सिंहच्याही पुढे आहे.

37 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने वाचा दीपिकाचा टॉप अभिनेत्री बननण्याचा प्रवास...

आत्मविश्वासाच्या अभावी बालपणी मित्र बनवले नाही

दीपिकाला बालपणी मित्र बनवण्यात थोडी अडचण व्हायची. आत्मविश्वासाच्या अभावाने बालपणी तिचे जास्त मित्र बनू शकले नाही. तथापि तिचे एका हॉलीवूड अभिनेत्यावर प्रेम होते. दीपिकाने एका मुलाखतीत सांगितले होते की, हॉलीवूड अभिनेता लिओनार्डो डी कॅप्रिओ तिचा क्रश होता. ती रोज झोपण्यापूर्वी लिओनार्डोच्या फोटोला किस करायची.

वडिलांच्या दबावामुळे बॅडमिंटनच्या सरावासाठी सकाळी 5 वाजता उठायची

दीपिकाचे वडील प्रकाश पदुकोण आंतरराष्ट्री बॅडमिंटनपटू होते आणि आजोबा रमेश म्हैसूर बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव होते. त्यामुळे दीपिकानेही मोठेपणी बॅडमिंटनमध्ये नाव कमवावे असे प्रकाश यांना वाटायचे. वडिलांचे म्हणणे ऐकून दीपिका रोज सराव करायला लागली. मात्र तिला यात जास्त रस नव्हता. यादरम्यान दीपिकाने अनेक स्पर्धाही खेळल्या. काही वर्षे ती बेसबॉलही खेळली.

जेव्हा आमिरसमोर उपाशी बसून राहिली 13 वर्षांची दीपिका

दीपिकाचे वडील प्रसिद्ध व्यक्ती होते. त्यामुळे त्यांच्या घरी मनोरंजन विश्वातील सेलिब्रिटींचे येणे-जाणे असायचे. 2000 मध्ये आमिर खान दीपिकाच्या घरी जेवायला विशेष अतिथी म्हणून आला होता. तेव्हा दीपिका फक्त 13 वर्षांची होती आणि तिला खूप भूक लागली होती. आमिरने तिला जेवण ऑफर केले नाही म्हणून ती न जेवता उपाशीच बसून राहिली होती.

10 वीत घेतला बॅडमिंटन सोडून मॉडेलिंग करण्याचा निर्णय

वडिलांनी सांगितल्याप्रमाणे दीपिकाला रोज सकाळी 5 वाजता उठून बॅडमिंटनच्या सरावासाठी जावे लागायचे, त्यानंतर शाळेत. शाळेतून आल्यावर दीपिका पुन्हा सराव करायची. 10 वीत येईपर्यंत दीपिकाला कळाले होते की ती केवळ वडिलांच्या दबावात बॅडमिंटन खेळत आहे आणि तिला यात करिअर करायचे नाही. एक दिवस दीपिकाने धाडस करत वडिलांना बॅडमिंटन सोडण्याची इच्छा सांगितली. सुदैवाने वडिलांनी तिचे ऐकले आणि दीपिकाने बॅडमिंटन सोडून मॉडेलिंगमध्ये पदार्पण केले.

मॉडेलिंगसाठी शिक्षण सोडले

2004 मध्ये दीपिकाने मॉडेलिंग सुरू केले. सुरुवातीला दीपिका फॅशन स्टायलिस्ट आणि कोरिओग्राफर प्रसाद बिडापांसोबत मॉडेलिंग करायची. यादरम्यान तिने सोशिओलॉजीच्या शिक्षणासाठी इंदरा गांधी राष्ट्रीय विद्यापीठात प्रवेश घेतला. मात्र मॉडेलिंगमुळे ती शिक्षणाकडे लक्ष देऊ शकली नाही. त्यामुळे तिने शिक्षण सोडले.

साबणाच्या जाहिरातीतून मिळाली ओळख

लिरिल साबणाच्या एका जाहिरातीत दीपिका दिसल्यावर तिचे खूप कौतुक झाले आणि तिला ओळख मिळाली. सोबतच तिने अनेक जाहिरातींत काम केले. यामुळे 2005 मध्ये दीपिकाला लॅक्मे फॅशन वीकमध्ये संधी मिळाली. डिझायनर सुनीत वर्मांसाठी रनवे वॉक केल्याबद्दल दीपिकाला मॉडेल ऑफ द इअर पुरस्कार मिळाला होता.

किंगफिशर कॅलेंडरमधून मिळाली प्रसिद्धी

2006 मध्ये दीपिकाला किंगफिशर कॅलेंडरच्या प्रिंट कॅम्पेनमध्ये जागा मिळाली. प्रसिद्ध डिझायनर व्हॅन्डेल रॉडरिक यांनी दीपिकाला गंजम ज्वेलरी क्लासमध्ये बघितले होते. तिथे त्यांनी दीपिकाला आपल्या मॅट्रिक्स मॉडेलिंग एजन्सीसाठी काम करण्याची ऑफर दिली. ते दीपिकाला पाहून म्हणाले होते - ऐश्वर्या रायनंतर आजपर्यंत आम्हाला इतका फ्रेश आणि सुंदर चेहरा मिळाला नव्हता.

21 वर्षांच्या वयात मुंबईला पोहोचली दीपिका

सतत मॉडेलिंग प्रोजेक्ट मिळाल्यावर दीपिका बंगळुरूहून मुंबईला आली. सुरुवातीला दीपिका तिच्या मावशीसोबत राहायची. 21 वर्षांची असताना दीपिकाला हिमेश रेशमियाने त्याचे गाणे नाम है तेरामध्ये घेतले. हे गाणे चार्टबस्टर ठरले आणि दीपिकाला देशभरात ओळख मिळाली.

कसा मिळाला पहिला चित्रपट ओम शांती ओम?

दीपिकाचे मॉडेलिंग मेन्टॉर व्हॅन्डेल रॉडरिक होते. ते मलायका अरोराचे जवळचे मित्र होते. फराह खान हॅप्पी न्यू इअर चित्रपटासाठी एका फ्रेश चेहऱ्याच्या शोधात होती तेव्हा तिने मलायकाचा सल्ला मागितला. मलायकाची याबद्दल रॉडरिक यांच्याशी चर्चा झाल्यावर त्यांनी दीपिकाचे नाव सुचवले. मलायकाने हे नाव फराह खानला सुचवले आणि सर्वकाही जुळून आले.

ओम शांती ओम नव्हे तर हॅप्पी न्यू इअरसाठी झाली होती दीपिकाची कास्टिंग

मलायकाने सांगितल्यावर फराह खानने दीपिकाचे गाणे नाम है तेरा पाहिले आणि तिच्या आधीच्या सर्व जाहिराती आणि फोटोशूटवरही काही दिवस चर्चा केली. फराहला दीपिकाचे काम आवडले आणि तिने दीपिकाला हॅप्पी न्यु इअरसाठी शाहरूखच्या अपोझिट कास्ट केले.

2006 मध्ये फराह खानचा चित्रपट हॅप्पी न्यू इअर बंद होण्याच्या मार्गावर असताना तिने दीपिकाला ओम शांती ओमसाठी शाहरूखसोबत कास्ट केले. हा चित्रपट दीपिकासाठी सर्वात मोठा ब्रेक ठरला. भूमिकेच्या तयारीसाठी दीपिकाने हेमा मालिनी आणि हेलन यांचे अनेक चित्रपट बघितले. त्यानंतर काही वर्षांनी फराहने हॅप्पी न्यू इअर बनवल्यावर तिने यात दीपिकालाच घेतले.

15 वर्षांच्या करिअरमध्ये 37 चित्रपट

ओम शांती ओम चित्रपटासाठी दीपिकाला सर्वोत्तम पदार्पणातील अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. तिला सर्वोत्तम अभिनेत्रीसाठी नामांकनही मिळाले होते. चित्रपटात दीपिकाच्या आवाजाचे डबिंग आर्टिस्ट मोना घोष शेट्टीने केले होते. 2007 पासून ते आतापर्यंत दीपिका सुमारे 37 चित्रपटांत दिसली आहे. तिच्याकडे सध्या पठाण, जवान, फायटरसारखे आगामी चित्रपट आहेत.

वाद आणि नातेसंबंधांतील अपयशामुळेही दीपिका चर्चेत

रणबीर कपूरसोबत नाते, टॅटू आणि ब्रेकअप - 2008 मध्ये बचना ए हसीनो चित्रपटाचे शूटिंग करताना दीपिकाचे रणबीर कपूरसोबत नाते सुरू झाले. काही महिन्यांतच दीपिकाने याची माहिती सार्वजनिक केली आणि आपल्या मानेवर रणबीर कपूरच्या नावाचा RK टॅटूही गोंदवला. एका वर्षातच रणबीरचे कॅटरिनासोबत रिलेशन सुरू झाले आणि दीपिकाला हे कळताच तिने त्याच्यापासून अंतर बनवले. दीपिकाने अनेकदा रणबीरवर धोका दिल्याचा आरोप केला. अनेक वर्षांनंतर ये जवानी है दिवानीच्या शूटिंगदरम्यान दोघांत पुन्हा मैत्री झाली.

बोल्ड गाण्यावर झाली केस - 2011 मध्ये दीपिकाने दम मारो दम या आयटम सॉन्गमध्ये दिसली होती. हे गाणे खूप बोल्ड होते. यावरून खूप वाद झाले आणि दीपिकावर न्यूडिटी आणि भावना दुखावल्याबद्दल केसही झाली.

रामलीला शीर्षकावरून वाद - 2013 मधील चित्रपट गोलियों की रासलीलाः रामलीला हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात सापडला. चित्रपटाचे शीर्षक रामलीला होते. या शीर्षकात बोल्ड लव्हस्टोरी दाखवल्याबद्दल हिंदू संघटनांनी याला खूप विरोध केला. रस्त्यांवर आंदोलने झाली आणि चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी झाली. वादात दीपिका, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि रणवीर सिंहविरोधात जालंधरमध्ये तक्रारही दाखल झाली होती. वादांपासून बचावासाठी चित्रपटाचे शीर्षक गोलियों की रासलीलाः राम-लीला असे करण्यात आले.

राणी पद्मावती बनल्यानंतर नाक कापणे आणि जीवे मारण्याच्या धमक्या - 2018 मधील चित्रपट पद्मावतमध्ये दीपिकाने राणी पद्मावतीची भूमिका साकारली होती. जोधपूरमध्ये शूटिंगदरम्यान धार्मिक संघटनांनी सेटवर तोडफोड केली आणि शूटिंग करणाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. यादरम्यान दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या चेहऱ्याला काळे फासून त्यांना धक्काबुक्की करण्यात आली होती. कारण होते चित्रपटाचे शीर्षक पद्मावती असणे.

वादापासून बचावासाठी चित्रपटाचे शीर्षक पद्मावतीवरून पद्मावत करावे लागले. चित्रपटाचे गाणे घूमर रिलीज झाल्यानंतरही वाद वाढला. गाण्यात राणी पद्मावती बनलेल्या दीपिकाचे लोकांसमोर नाचणे आणि कंबर दाखवणे लोकांना सहन झाले नाही. यामुळे रस्त्यांवर खूप आंदोलने झाली आणि दीपिकाला जीवे मारण्याची धमकी मिळाली.

करणी सेनेच्या लोकांनी दीपिकाचे नाक कापण्याची धमकीही दिली होती. दुसरीकडे अशी बातमीही पसरवली गेली की, दीपिकाचे नाक कापणाऱ्याला बक्षीस मिळेल. त्यामुळे दीपिकाला संरक्षण देण्यात आले. अखेर सेन्सॉर बोर्डाच्या निर्देशांनंतर एडिटिंगद्वारे दीपिकाचे पोट झाकण्यात आले.

जेएनयू आंदोलनाचा वाद - 2020 मध्ये छपाक रिलीज होण्याच्या आधी दीपिका जेएनयू आंदोलनात सहभागी झाली होती. दीपिला डावे समर्थक असल्याचे सांगत तिच्यावर अनेक आरोप लावण्यात आले. यामुळे दीपिकाची निर्मिती असलेला छपाक चित्रपट फ्लॉप ठरला.

ड्रग चॅटमध्येही दीपिका अडकली - सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने दीपिका आणि तिची मॅनेजर करिश्मा प्रकाशला चौकशीसाठी बोलावले होते. दीपिका आणि तिच्या मॅनेजरचे अनेक चॅट समोर आले होते. यात दोघी हॅश आणि मालसारख्या शब्दांचा उल्लेख होता. चौकशीनंतर दीपिकाला सोडण्यात आले.

सामाजिक कार्यातही दीपिका पुढे

  • 2010 मध्ये दीपिकाने महाराष्ट्रातील आंबेगाव हे गाव दत्तक घेतले
  • 2015 मध्ये दीपिकाने तिची डिप्रेशन जर्नी सार्वजनिकरित्या शेअर केली. यानंतर दीपिकाने यावर्षी द लिव्ह लव्ह लाफ फाऊंडेशन सुरू केले. ते मेंटल हेल्थच्या क्षेत्रात काम करते.
  • लिव्ह लव्ह लाफ फाऊंडेशनसाठी निधी उभारण्यासाठी दीपिका आपले वैयक्तिक कपडे आणि अॅक्सेसरीज यांचा लिलाव करते.
  • 2016 पासून दीपिका फेसबूक आणि आसरा संघटनेच्या सहकार्याने मल्टिलिंग्वल टूल आणि एज्युकेशनल सोर्सवर काम करत आहे. यामुळे आत्महत्येचा विचार करणाऱ्यांना योग्य दिशा दिली जाऊ शकेल.
  • दीपिका इंडियन सायकिअॅट्रिक सोसायटीचीही ब्रँड अँबेसॅडर आहे.
  • मेंटल हेल्थ अवेअरनेससाठी दीपिकाला 2020 मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमकडून क्रिस्टल अवॉर्डही मिळाला आहे.
  • 2020 मध्ये दीपिका पदुकोण सीएए कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना समर्थन देण्यासाठी त्यात सहभागी झाली होती. यामुळे भाजपने तिचा चित्रपट छपाकचा विरोध केला आणि चित्रपट फ्लॉप ठरला.

बिझनेस वूमन आहे दीपिका

2013 मध्ये दीपिका पदुकोणने वॅन ह्युशेनसोबत कोलॅबोरेट करत क्लोदिंग कलेक्शन लॉन्च केले होते.

2015 मध्ये दीपिकाने मिंत्रासोबत ऑल अबाऊट यू क्लोदिंग ब्रँड लॉन्च केला.

दीपिकाने केए इंटरप्रायझेसच्या माध्यमातून इंटरनॅशनल फूड सप्लायमध्ये जागा बनवली आहे. हा योगर्ट आणि फ्रोझन फूड बिझनेस आहे. याचे नाव एपिगेमिया आहे. याशिवाय दीपिका इलेक्ट्रिक टॅक्सी ब्ल्यू स्मार्टमधूनही कमावते.

2022 मध्ये दीपिकाने स्किनकेअर प्रॉडक्ट ब्रँड 82 डीग्री ईस्ट सुरू केला.

4 फ्लॉप चित्रपटांमुळे करिअरचा वेग मंदावला, कॉकटेलमुळे रुळावर आले होते करिअर

ओम शांती ओम, बचना ए हसीनो, लव्ह आजकलच्या ब्रेकनंतर कार्तिक कॉलिंग कार्तिक, चांदनी चौक टू चायना, ब्रेक के बादसारखे चित्रपट फ्लॉप झाले होते. यानंतर 2012 मध्ये कॉकटेल चित्रपटात दीपिकाला वेरोनिकाची भूमिका मिळाली होती. हा चित्रपट हिट ठरला. यानंतर दीपिकाने रेस 2, ये जवानी है दिवानी, चेन्नई एक्सप्रेस, गोलियों की रासलीलाः राम-लीला, हॅप्पी न्यू इअर, तमाशा, पिकू, बाजीराव मस्तानी, पद्मावतसारखे मोठे हिट चित्रपट दिले.

4 वर्षांपासून दीपिकाला हिटची प्रतीक्षा

दीपिका पदुकोणचा अखेरचा हिट चित्रपट 2018 मधील पद्मावत होता. यानंतर दीपिकाच्या खात्यात छपाक, 83 हे चित्रपट राहिले. दीपिकाचा चित्रपट गहराईयां 2022 मध्ये ओटीटीवर रिलीज झाला. मात्र त्याला प्रेक्षकांचा नकारात्मक प्रतिसाद मिळाला. यादरम्यान दीपिकाने झिरो, ब्रह्मास्त्र, सर्कसारख्या चित्रपटांत कॅमिओ साकारला.

बातम्या आणखी आहेत...