आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Entertainment
 • Bollywood
 • Claim In Report Deepika Padukone's Manager Karishma Prakash Accused Of Leaking Drug Chat, Discussing With Husband Ranveer Through Video Call With 12 member Legal Team

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन:रिपोर्टमध्ये दावा - दीपिका पदुकोणचा मॅनेजर करिश्मा प्रकाशवर ड्रग चॅट लीक केल्याचा आरोप, पती रणवीरसह व्हिडिओ कॉलद्वारे 12 सदस्यीय लीगल टीमसोबत केली चर्चा

मुंबई7 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • एनसीबीच्या हाती लागले दीपिका-करिश्माचे ड्रग चॅट
 • एनसीबीने दीपिकाला 25 सप्टेंबरला चौकशीसाठी बोलावले

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाशी संबंधित ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशीत दीपिका पदुकोणसह बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत. त्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने त्यांना वेगवेगळ्या तारखांना हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. दरम्यान, असेही वृत्त आहे की, आपले नाव या प्रकरणात समोर आल्यानंतर दीपिकाने तिची मॅनेजर करिश्माला यासाठी दोषी ठरवले आहे. करिश्मानेच एनसीबीसमोर ड्रग चॅट लीक केल्याचे तिचे म्हणणे आहे.

रिपब्लिक टीव्हीच्या वृत्तानुसार, दीपिका आता करिश्मावर कोणतेही रहस्य किंवा इतक कुठलीही माहिती उघड न करण्यासाठी दबाव आणत आहे. चॅनलच्या रिपोर्टनुसार, दीपिकाची मॅनेजर आणि 'क्वान' कंपनीची कर्मचारी करिश्मा प्रकाश आणि जया साहा यांनी एनसीबीसमोर ड्रग्ज सीक्रेट्स बद्दल खुलासे केले आणि त्यांच्यासमोर ड्रग चॅट लीक केले, असा दीपिकाला संशय आहे.

 • 12 वकिलांच्या लीगल टीमसोबत सुरु आहे चर्चा

तर दुसरीकडे, एनसीबीकडून समन्स मिळाल्यानंतर दीपिकाने आपल्या 12 सदस्यांच्या कायदेशीर टीमसोबत पुढील रणनीती आखण्यासाठी व्हिडिओ कॉलद्वारे चर्चा केली असल्याचे वृत्त आहे. यावेळी, तिचा पती रणवीर सिंह आणि 'क्वान' कंपनीतील काही लोक तिच्यासह या व्हिडिओ कॉलमध्ये हजर असल्याचे समजते.

 • ड्रग चॅट समोर आल्यानंतर अडकली दीपिका

दीपिका आणि तिची टॅलेंट मॅनेजर करिश्मा प्रकाश यांचे ड्रग्जसंदर्भातील व्हॉट्सअ‍ॅप चॅट एनसीबीला मिळाले आहेत. हे चॅट ऑक्टोबर 2017 चे आहेत. यात दीपिका करिश्माकडे 'माल'संदर्भात विचारणा करतेय. दीपिकाने तिला हॅश आणि वीडबद्दल विचारले होते. तर करिश्माने तिच्याकडे ते असल्याचे सांगितले होते.

 • एनसीबीने चारही अभिनेत्रींना समन्स पाठविले

टॅलेंट मॅनेजर जया साहाच्या चौकशीनंतर बुधवारी एनसीबीने चार अभिनेत्रींना चौकशीसाठी समन्स बजावले. एनसीबीने अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान व रकुल प्रीत सिंगला वेगवेगळ्या दिवशी चौकशीसाठी बोलावले आहे. रकुल प्रीत सिंगला आज बोलावण्यात आले होते. मात्र तिने समन मिळाला नसल्याचा बहाणा करत चौकशीसाठी जाणे टाळले त्यानंतर आता तिला 25 सप्टेंबर रोजी बोलावण्यात आले आहे. याचदिवशी दीपिकालादेखील बोलावण्यात आले आहे. तर श्रद्धा आणि सारा यांना 26 तारखेला हजर व्हायचे आहे.

 • समन मिळाल्यानंतर दीपिका मुंबईत परतली

दीपिका तिच्या एका आगामी चित्रपटाच्या शूटिंगच्या संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून गोव्यात होती, परंतु एनसीबी समन्स मिळाल्यानंतर ती गुरुवारी चार्टर प्लेनने मुंबईत परतली आहे.

 • अनेक सेलेब्सची नावे समोर आली आहेत

या प्रकरणात आतापर्यंत अभिनेत्री सारा अली खान, रकुल प्रीत सिंग, श्रद्धा कपूर, दीपिका पदुकोण, दिया मिर्झा, नम्रता शिरोडकर, फॅशन डिझायनर सिमोन खंबाटा आणि निर्माता मधु मांटेना यांची नावे आतापर्यंत समोर आली आहेत. बुधवारी एनसीबीने मधु मांटेनाची चौकशी केली.

बातम्या आणखी आहेत...