आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुपर हीरो सिनेमा:‘कृष 4’मध्ये हीरोच नव्हे तर खलनायकाच्या भूमिकेत दिसणार हृतिक रोशन, प्रियांका चोप्राच्या जागी लागणार दीपिका पदुकोणची वर्णी

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'कृष 3' मध्ये हृतिकसोबत प्रियांका चोप्रा झळकली होती. मात्र निर्माते आता प्रियांका ऐवजी दीपिकाच्या नावाचा विचार करत आहेत.

हृतिक रोशन स्टारर ‘कृष’ फ्रँचायझीच्या चौथ्या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. यात त्याच्यासोबत कोणत्या अभिनेत्रीला घेण्यात येईल यावरही चर्चा सुरू आहे. मात्र सध्या तरी कृष 4 विषयी कोणतीच घोषणा आली नाही मात्र या चित्रपटाविषयी सतत काही ना काही चर्चा सुरुच आहे. ती म्हणजे, या मेगा बजेटच्या चित्रपटात दीपिका पदुकोणला घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.

दीपिकाचे नाव आले समोर

अद्याप 'कृष 4' संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र दिग्दर्शक राकेश रोशन स्वत: दीपिकाला या चित्रपटात घेऊ इच्छित असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे दीपिकाच्या आधी किआरा अडवाणी आणि कृती सेनन यांच्या नावावरही चर्चा झाली होती. मात्र या दोघींपैकी एकीलाही घेण्यात आले नाही. सध्या तर चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे.

खलनायकाच्या रुपात दिसणार हृतिक

कहाणीविषयी राकेश यांनी सांगितले की, कृष 4 मध्ये हृतिक हीरोसोबतच खलनायकाची भूमिकाही साकारणार आहे. या चित्रपटात सुपरहीराे कृषचे जग मोठे आणि भव्य दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...