आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने चित्रपटसृष्टीत 15 वर्षे पूर्ण केली आहेत. आपल्या करिअरमध्ये दीपिकाने एकापेक्षा एक चित्रपट दिले आहेत. दरम्यान, दीपिका नुकतीच स्पॉट झाली होती, ज्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये दीपिका कॅज्युअल आणि कम्फर्टेबल लूकमध्ये दिसली. यादरम्यान दीपिकाही पापाराझींना पाहून हसली. सोशल मीडियावर तिच्या या व्हिडिओवर चाहते भरभरून प्रेम करत आहेत.
या सुपरहिट चित्रपटांमधून स्टार झाली दीपिका
दीपिका पदुकोणने आपल्या करिअरची सुरुवात 'ओम शांती ओम' या चित्रपटातून केली होती. या चित्रपटात ती शाहरुख खानसोबत मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटाद्वारे दीपिका एका रात्रीतून स्टारपदावर पोहोचली होती. यानंतर तिने 'ये जवानी है दिवानी', 'राम-लीला', 'बाजीराव-मस्तानी', 'पद्मावत' आणि 'पीकू' सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आता लवकरच ती शाहरुख खानसोबत 'पठाण' चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. पाहा व्हिडिओ...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.