आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवीन वर्षात दीपिकाचा चाहत्यांना धक्का:अभिनेत्री दीपिका पदुकोणने डिलीट केल्या सर्व सोशल मीडिया पोस्ट, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी शेअर केली ऑडिओ डायरी

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दीपिकाने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी एक ऑडिओ डायरी शेअर केली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने सोशल मीडिया अकाउंट्सवरुन 2020 च्या शेवटच्या दिवशी म्हणजे 31 डिसेंबर रोजी सर्व सोशल मीडिया पोस्ट डिलीट केल्या आहेत. तर आज म्हणजे 1 जानेवारी रोजी दुपारी तिने एक ऑडिओ डायरी शेअर केली आहे. या माध्यमातून दीपिकाने आपल्या चाहत्यांना नवीन वर्षाचा शुभेच्छा दिल्या आहेत.

मात्र, दीपिकाने आपल्या सर्व जुन्या पोस्ट डिलीट करण्याचा अचानकपणे हा निर्णय का घेतला हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

दीपिकाचे इंस्टाग्रामवर जवळपास 5 कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तिने केवळ इंस्टाग्रामच नव्हे तर ट्विटर आणि फेसबुक या सोशल मीडिया अॅपवरुनदेखील तिच्या पोस्ट डिलीट केल्या आहेत. त्यामुळे 1 जानेवारी रोजी दुपारी 12.30 वाजेपर्यंत तिच्या अकाऊंटवर कोणतीही पोस्ट दिसली नाही.

विशेष म्हणजे या पोस्ट दीपिकाने स्वतः डिलीट केल्या की अन्य कोणत्या तांत्रिक कारणामुळे तिच्या पोस्ट डिलीट झाल्या आहेत. हे मात्र, अद्याप स्पष्ट झालेलं नाही. शिवाय यावर दीपिकाने देखील अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही.

बातम्या आणखी आहेत...