आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिकाच्या हातूनच का झाले FIFA विश्वचषकाचे अनावरण?:भारतीय अभिनेत्रीची निवड होण्यामागील 'हे' आहे खास कारण

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

18 डिसेंबर रोजी झालेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिनाने ट्रॉफीवर नाव कोरले. अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव केला. तब्बल 36 वर्षांनी अर्जेंटिनाचे जगज्जेते बनण्याचे स्वप्न पूर्ण झालं. तसेच मेस्सीच्या चाहत्यांचे त्याला विश्वचषक जिंकताना पाहण्याचे स्वप्नही पूर्ण झाले. हा दिवस बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या करिअरमधील सर्वात मोठा दिवस ठरला. रविवारी रात्री दीपिकाच्या हस्ते फिफा विश्वचषकाचे अनावरण झाले.

विशेष म्हणजे हा बहुमान मिळणारी दीपिका पहिली भारतीय ठरली आहे. आता त्याचे फोटो आणि व्हिडिओही समोर आले आहेत. यात दीपिका खूपच ग्लॅमरस दिसत आहे. यावेळी दीपिका व्हाइट शर्ट आणि गोल्डन ओव्हर कोटमध्ये दिसली.

स्पॅनिश फुटबॉलपटूसोबत दीपिकाची एन्ट्री
दीपिकाने स्पॅनिश फुटबॉलपटू केर कासिलाससह कार्यक्रमात प्रवेश केला आणि चषकाचे अनावरण केले. पण दीपिकाचा फुटबॉलशी काहीही संबंध नसताना ट्रॉफी लाँच करण्यासाठी तिची निवड का करण्यात आली, हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

18 कॅरेट सोने आणि मॅलाकाइटने बनला आहे चषक
6.175 किलो वजनाचा हा चषक 18 कॅरेट सोने आणि मॅलाकाइटने बनलेला आहे. केवळ काही निवडकच व्यक्तीच फुटबॉल विश्वचषकाला स्पर्श करू शकतात. यात माजी फिफा विश्वचषक विजेते आणि राष्ट्र प्रमुखांचाच समावेश आहे. आता हा बहुमान दीपिकाला मिळाला आहे.

फिफा ट्रॉफीच्या अनावरणासाठी दीपिकाची निवड का करण्यात आली?

फिफा विश्वचषक ट्रॉफीची केस जागतिक लक्झरी ब्रँड लुई विटॉनने डिझाइन केलेली आणि बनवली आहे. दीपिका या लग्झरी ब्रँडची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे. त्याशिवाय दीपिका इतरही अनेक आंतरराष्ट्रीय लक्झरी ब्रँड्सचा ग्लोबल चेहरा देखील आहे. टाईम मॅगझिनमध्येही दीपिकाचे दोन वेळा नाव आले. शिवाय दीपिका कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्येही खास एन्ट्री केली होती. याची ती ज्युरी मेंबरही होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची वेगळी ओळख दीपिकाने निर्माण केली आहे.

सध्या 'पठाण' चित्रपटाच्या वादामुळे चर्चेत आहे दीपिका
दीपिका लवकरच शाहरुख खानसोबत 'पठाण' या चित्रपटात झळकणार आहे. अलीकडेच या चित्रपटातील बेशरम रंग हे गाणे रिलीज झाले. पण गाणे प्रदर्शित होताच वादाला तोंड फुटले. या गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी परिधीन केली आहे. ही भगव्या रंगाची बिकिनी घातल्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या असून भगव्या रंगाचाही अपमान केला असल्याचे काही हिंदू आणि मुस्लिम संघटनांचे म्हणणे आहे. अनेक राज्यांनी चित्रपट प्रदर्शित न करण्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. दीपिका आणि शाहरुखला टीकेचा सामना करावा लागतोय. पुढील वर्षी 25 जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

  • दीपिकाने केले FIFA विश्वचषकाचे अनावरण:चषकाचे अनावरण करणारी पहिली भारतीय, रणवीर सिंगचीही उपस्थिती

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने रविवारी रात्री फिफा विश्व चषकाचे अनावरण केले. असा बहुमान मिळणारी दीपिका पहिली भारतीय ठरली आहे. आता त्याचे फोटो आणि व्हिडिओही समोर आले आहेत. यात दीपिका खूपच ग्लॅमरस दिसत आहे. यात दीपिका पांढरा शर्ट आणि गोल्डन ओव्हर कोटमध्ये दिसली. वाचा सविस्तर...

बातम्या आणखी आहेत...