आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिका पदुकोणचा राग:रिपोर्ट्समध्ये दावा - मीडिया फोटोग्राफर्सने केला कारचा पाठलाग तर भडकली दीपिका, कायदेशीर कारवाईची दिली धमकी

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काही फोटोग्राफर्सने दीपिकाच्या कारचा पाठलाग केल्यामुळे हा वाद झाल्याचे सांगितले जात आहे.

दीपिका पदुकोण नुकतीच धर्मा प्रोडक्शनच्या खार येथी ऑफिसबाहेर दिसली होती. रिपोर्ट्सनुसार, येथून निघाल्यानंतर काही मीडिया फोटोग्राफर्ससोबत तिचा वाद झाला. हा वाद एवढा वाढला की, अभिनेत्रीने त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली. काही फोटोग्राफर्सने दीपिकाच्या कारचा पाठलाग केल्यामुळे हा वाद झाल्याचे सांगितले जात आहे.

हॉटेलच्या रस्त्यामध्ये झाला फोटोग्राफर्ससोबत वाद
फ्रीपेस जरनलच्या रिपोर्टनुसार, फोटोग्राफर्सला वाटले की, दीपिका धर्मा ऑफिसमधून निघाल्यानंतर आपल्या सासु-सासऱ्यांच्या घरी जाईल. मात्र ती तिथे जाण्याऐवजी लँड्स अँड हॉटेलमध्ये गेली, जिथे तिची एक मीटिंग होती.

हॉटेलच्या रस्त्यामध्ये दीपिकाच्या ड्रायव्हरने पाहिले की, काही फोटोग्राफर्स त्यांच्या कारचा पाठलाग करत आहेत. यानंतर कार थांबली आणि दीपिकाचा बॉडीगार्ड बाहेर आला. फोटोग्राफर्ससोबत बॉडीगार्डचा वाद झाला.

नंतर स्वतः दीपिका कारमधून खाली उतरली आणि त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान फोटोग्राफर्ससोबत तिचा वाद एवढा वाढला की, तिने कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली.

पठानसाठी 15 कोटींची फीस घेत आहे?
दीपिकाच्या सध्याच्या कामांविषयी बोलायचे झाले तर दीपिका नुकतीच डायरेक्टर शकुन बत्रांचा अफकमिंग चित्रपटाची शूटिंग पूर्ण करुन गोव्यावरुन परतली आहे. रिपोर्ट्सनुसार ती सिद्धार्थ आनंदचा अॅक्शन थ्रिलर 'पठान' मध्ये दिसणार आहे.

बॉलीवूड हंगामाने आपल्या रिपोर्टमध्ये लिहिले आहे की, शाहरुख खान स्टारर या फिल्मसाठी दीपिका 14-15 कोटी रुपये फीस घेत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी जॉन अब्राहमची फीस तिच्यापेक्षा केवळ 5-6 कोटी रुपये जास्त आहे. तो या चित्रपटासाठी 20 कोटी चार्ज करत आहे. चित्रपटाचे एकूण बजेट 200 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. ज्यामध्ये शाहरुख सह सर्व अॅक्टर्सची फीस आणइ पब्लिसिटीसह सर्व खर्चाचा समावेश आहे. वृत्तांनुसार हा चित्रपट पुढच्या दिवाळीला रिलीज होईल.

बातम्या आणखी आहेत...