आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इमोशनल पोस्ट:दीपिका पदुकोणला येतेय इरफानची आठवण, 'पिकू'च्या सेटवरचा व्हिडिओ शेअर करुन लिहिले - परत या

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दीपिकाने लिहिले आहे, "कृपया परत या इरफान खान."

अभिनेत्री दीपिका पादुकोणला दिवंगत अभिनेता इरफान खानची आठवण येतेय. तिने एक व्हिडिओ शेअर करुन इरफानला परत येण्याचे भावूक आवाहन केले आहे. हा व्हिडिओ 2015 मध्ये आलेल्या 'पीकू' चित्रपटाच्या सेटवरचा आहे, ज्यात दोघे लॉन टेनिस खेळताना दिसत आहेत. कॅप्शनमध्ये दीपिकाने लिहिले आहे, "कृपया परत या इरफान खान."

View this post on Instagram

please come back!💔 #irrfankhan

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on May 8, 2020 at 8:27pm PDT

सह-कलाकार म्हणून या दोघांचा एकमेव चित्रपट आहे 'पीकू'

इरफान खान आणि दीपिका पदुकोण यांनी  शुजित सरकारच्या ‘पीकू’ चित्रपटात एकत्र काम केले होते. हा दोघांचा सहकलाकार म्हणून एकमेव चित्रपट आहे.  शुक्रवारी या चित्रपटाला 5 वर्षे पूर्ण झाली, यावेळी दीपिकाने इरफानसाठी हा भावनिक संदेश शेअर केला. दीपिकाने सेटवरचा आणखी फोटो शेअर केला आणि या चित्रपटातील 'लम्हें गुजर गए' या गाण्यातूल त्याला श्रद्धांजली वाहिली.

View this post on Instagram

लम्हे गुज़र गये चेहरे बदल गये हम थे अंजानी राहो में पल में रुला दिया पल में हसा के फिर रह गये हम जी राहो में थोड़ा सा पानी है रंग है थोड़ी सी छावो है चुभती है आँखो में धूप ये खुली दिशाओ में और दर्द भी मीठा लगे सब फ़ासले ये कम हुए ख्वाबो से रस्ते सजाने तो दो यादो को दिल में बसाने तो दो लम्हे गुज़र गये चेहरे बदल गये हम थे अंजानी राहो में थोड़ी सी बेरूख़ी जाने दो थोड़ी सी ज़िंदगी लाखो स्वालो में ढूंधू क्या थक गयी ये ज़मीन है जो मिल गया ये आस्मा तो आस्मा से मांगू क्या ख्वाबो से रस्ते सजाने तो दो यादो को दिल में बसाने तो दो -Piku Rest in Peace my Dear Friend...💔 #rana #piku #bhaskor @shoojitsircar @juhic3 #5yearsofpiku

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on May 8, 2020 at 1:45am PDT

'पीकू' शिवाय या दोघांचे अन्य चित्रपटांशीही कनेक्शन आहे. 2009 मध्ये आलेल्या इरफान खान स्टारर 'बिल्लू' मध्ये दीपिकाने कॅमिओ केला होता. तर दीपिका पादुकोण-रणवीर सिंग स्टारर 'बाजीराव मस्तानी' (2015) या चित्रपटासाठी इरफानने नॅरेटर व्हॉइस ओव्हर दिला होता. 

इरफान खानचे 10 दिवसांपूर्वी झाले निधन 

29 एप्रिल रोजी इरफान खान (वय 53) चे मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात निधन झाले. तो दोन वर्षांपासून न्यूरो एंडोक्राइन नावाच्या दुर्मिळ  कर्करोगाशी झुंज देत होता. इरफानचा अखेरचा चित्रपट 'अंग्रेजी मीडियम' त्याच्या मृत्यूच्या दीड महिन्यापूर्वी प्रदर्शित झाला होता, त्यात राधिका मदन आणि करीना कपूर यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...