आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ड्रग्ज चॅटमध्ये मोठा खुलासा:दीपिका पदुकोणचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट आलेत समोर, या कलमांतर्गत दाखल होऊ शकतो गुन्हा, अटक होण्याचीदेखील शक्यता

लेखक: आशीष राय, मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या चॅटच्या आधारावर एनसीबी दीपिकाला समन्स बजावू शकते.

ड्रग्ज चॅट प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) केलेल्या चौकशीत आता मोठा खुलासा झाला आहे. सोमवारी रात्री या प्रकरणात दीपिका पदुकोण आणि तिची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांच्यात झालेल्या संभाषणाचा काही भाग समोर आला होता. यात दीपिकासाठी D आणि करिश्मासाठी K या कोडनेम्सचा वापर करण्यात आला होता. आता सर्वप्रथम भास्करला दीपिका पदुकोणच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटचे स्क्रीनशॉट्स मिळाले आहेत. दीपिका आणि करिश्मा यांच्यातील हे संभाषण 28 ऑक्टोबर 2017 रोजी झाले होते.

भास्करजवळ असलेल्या स्क्रीनशॉटवरून याची खात्री पटली आहे की, दीपिका करिश्मासोबत झालेल्या संभाषणात 'हॅश' आणि 'वीड' सारखे शब्द वापरत आहे. बंदी असलेल्या ड्रग्ज संबंधित भाषेत, हॅशचा उपयोग चरससाठी केला जातो. मात्र या दोघींमधील संभाषणात हॅश आणि वीडचा वापर कुणासाठी होतोय, हे स्पष्ट झाले नाही. यात ड्रग्जचे प्रमाणही नमूद केलेले नाही, परंतु दीपिकाच्या अडचणीत वाढ होण्यासाठी हे व्हॉट्सअॅप चॅट पुरेसे आहेत. जर तिची चौकशी झाली तर याकडे पुरावे म्हणून बघितले जाईल. आणि तिच्याविरूद्ध गंभीर कलमांखाली खटला दाखल होऊ शकतो.

दीपिका आणि करिश्मा यांच्यातील संभाषणाचे स्क्रीनशॉट्स पहा

सकाळी 10:04 वाजता : दीपिका करिश्माला विचारते, 'तुझ्याकडे माल आहे का?'

10:05 वाजताः करिश्मा लिहिते, 'माझ्याकडे आहे, पण घरी आहे. मी वांद्रेमध्ये आहे.'

10:05 वाजताः पुढच्या चॅटमध्ये करिश्मा लिहिते, "तुला हवे असल्यास मी अमितला सांगेन." (अमित कोण आहेत, हे स्पष्ट झाले नाही.)

10:07 वाजता: दीपिका लिहिते, 'Yes!! Pllleeeeasssee..'

10:08 वाजता: करिश्मा लिहिते, "अमितजवळ आहे. तो घेऊन येत आहे."

10:12 वाजता: दीपिका लिहिते, 'हॅश न?' पुढच्या चॅटमध्ये ती लिहिते, 'वीड (गांजा) नाही?'

10: 14 वाजता: करिश्मा लिहिते, 'तू कोकोला किती वाजता पोहचणार आहे?' (कोको मुंबईतील एक बार आहे.)

10: 15: दीपिका लिहिते, '11:30 किंवा 12 पर्यंत'.

10: 15 वाजता: दीपिका पुढे लिहिते, 'शैल* तिथे किती वाजता पोहोचेल? (शैल कोण आहे, हे स्पष्ट नाही.)

त्यावर करिश्मा लिहिते, 'मला वाटते त्याने 11:30 वाजता म्हटले होते कारण 12 वाजता त्या दुस-या ठिकाणी पोहोचायचे होते.'

या गंभीर कलमांतर्गत गुन्हा नोंदवला जाऊ शकतो

  • कलम 8 (सी): जाणूनबुजून अशी मालमत्ता खरेदी करणे किंवा त्याचा वापर करणे, जे या कायद्याचे उल्लंघन करणारे ठरेल.
  • कलम 20 (B) (ii): जर कुणी अल्प प्रमाणात बंदी असलेले ड्रग्ज बनवतो, स्वतःजवळ बाळगतो, विक्री करतो, खरेदी करतो किंवा त्याचा वापर करताना आढळतो.
  • कलम 29: कट रचणे किंवा एखाद्याला ड्रग्ज घेण्यास प्रवृत्त केल्यासंदर्भात दोषी आढळल्यास शिक्षेची तरतूद आहे.
  • कलम 22 : ड्रग्जच्या कमी क्वांटीटीसाठी एक वर्षाची शिक्षा, जास्त प्रमाणात असल्यास दहा वर्षांची आणि व्यावसायिकरित्या वापरल्यास 20 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.
  • कलम 27 A: बंदी असलेल्या ड्रग्जसंदर्भात प्रोत्साहन देण्यासाठी किंवा मदत करण्यासाठी किमान 10 वर्षे आणि जास्तीत जास्त 20 वर्षांच्या शिक्षेची तरतूद. कोर्टाची इच्छा असल्यास ते दोन लाख रुपयांहून अधिक दंड देखील आकारू शकते.

करिश्माच्या माध्यमातून ड्रग्ज कनेक्शन दीपिकापर्यंत पोहोचले

दीपिकाची मॅनेजर म्हणून काम करणारी करिश्मा प्रकाश 'क्वान' नावाच्या सेलिब्रिटी मॅनेजमेंट कंपनीत काम करते. ही कंपनी 40 हून अधिक बॉलिवूड सेलिब्रिटींना टॅलेंट मॅनेजर पुरवते. रिया चक्रवर्तीची मॅनेजर जया साहा ही देखील याच कंपनीत काम करते. जया करिष्माची सीनिअर आहे. एनसीबी, सीबीआय आणि ईडीच्या पथकाने अनेकदा जयाची चौकशी केली. चौकशीदरम्यान एनसीबीला जया आणि करिश्मा यांच्यातील चॅटसंदर्भात माहिती मिळाली. यानंतर हे प्रकरण दीपिकापर्यंत पोहोचले.

दीपिकाचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट असे एक्सट्रॅक्ट झाले

पोलिस खात्याशी संबंधित एका अधिका्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दैनिक भास्करला सांगितले की, चॅटचे स्वरूप पाहून हे दीपिकाचे ओरिजिनिल चॅट आहेत, असे म्हटले जाऊ शकते. या चॅट्सच्या खाली लिहिलेले सोर्स हे सिद्ध करतात की ते दीपिका किंवा तिच्या मॅनेजरच्या मोबाइल फोनवरून नव्हे तर सॉफ्टवेअरच्या मदतीने एक्सट्रॅक्ट केले गेले आहेत. सामान्यत: केंद्रीय अन्वेषण एजन्सी अशा पद्धतीने चॅट्स रिट्रीव्ह करु शकतात.

सॉफ्टवेअरद्वारे तपास यंत्रणेने दीपिकाचे चॅट एक्सट्रॅक्ट केले आहेत.
सॉफ्टवेअरद्वारे तपास यंत्रणेने दीपिकाचे चॅट एक्सट्रॅक्ट केले आहेत.
बातम्या आणखी आहेत...