आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेत्री दीपिका पदुकोण हिने गेल्या वर्षी 'छपाक' या चित्रपटाच्या दरम्यान महाभारतातील द्रौपदीची भूमिका साकारणार असल्याची घोषणा केली होती. मात्र आता या चित्रपटाविषयी नवी अपडेट आली आहे. ती म्हणजे हा प्रोजेक्ट आता थंड्या बस्त्यात गेला आहे.
हे आहे कारण...
सूत्रानुसार, हा चित्रपट काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आला आहे. खरं तर या चित्रपटासाठी हवा तसा दिग्दर्शक मिळत नसल्याचे बोलले जात आहे. यासाठी अनेक मोठी नावे यादीत होती. काही नावांवर विचार सुरु होता. तरीदेखील काही जमले नाही. यासाठी विशाल भारद्वाज यांच्या नावाची चर्चा सुरु होती. शेवटी हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला आहे. नंतर कथेत बदल करुन दुसरा चित्रपट बनवण्यात येईल. दीपिकानेदेखील हा चित्रपट सोडला असून तिने आता शकुन बत्रांचा द इंटर्न साइन केला आहे. याशिवाय ती शाहरुख खानसोबत पठान आणि हृतिक रोशनसोबत फायटर या चित्रपटात झळकणार आहे.
विशेष म्हणजे दीपिकासोबतचा हृतिकचा हा पहिलाच चित्रपट असले. सिद्धार्थ आनंद या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार असून पुढील वर्षी म्हणजे 30 सप्टेंबर 2022 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल. हृतिकने या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला होता.
देशभक्तीवर आधारित असेल 'फायटर'
हृतिकने चित्रपटाचा टीझर शेअर करताना हा चित्रपट भारतीय लष्करातील एका सैनिकावर आधारित असेल, असे सांगितले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांच्यासह हृतिक तिस-यांदा काम करणार आहे. यापूर्वी या जोडीने वॉर आणि बँग बँगमध्ये एकत्र काम केले होते. मार्फ्लिक्स बॅनरच्या या चित्रपटाची ममता-सिद्धार्थ निर्मिती करत आहेत. वृत्तानुसार, हृतिक आणि दीपिका दोघेही या चित्रपटात स्टंट करताना दिसणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.