आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिमानास्पद:टाइम मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकली दीपिका पदुकोण, हा मान पटकावणारी ठरली सहावी भारतीय सेलिब्रिटी

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दीपिका TIME मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकली आहे. टाइम मॅगझिनच्या मुखपृष्ठावर स्थान मिळवणारी दीपिका सहावी भारतीय सेलिब्रिटी ठरली आहे. तिच्या आधी परवीन बाबी, ऐश्वर्या राय बच्चन, प्रियांका चोप्रा, आमिर खान आणि शाहरुख खान या भारतीय कलाकारांनी टाइम मॅगझिनच्या कव्हर पेजवर स्थान मिळवले होते.

याबाबत दीपिकाने सांगितले, 'माझ्या देशात राहात असताना जगभरात प्रभाव पाडण्याचे माझे ध्येय नेहमीच असणार आहे.' ती पुढे म्हणाली, 'भारतीय सिनेमाने सीमा ओलांडल्या आहेत आणि आज भारतीय लोक सर्वत्र आहेत, त्यामुळे तुम्ही कुठेही गेलात तर तुम्हाला प्रसिद्धी मिळते.'

दीपिकाने टाइमच्या कव्हर पेजसाठी केलेल्या फोटोशूटच्या BTS चे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

TIME मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकलेले भारतीय सेलिब्रिटी
यापूर्वी 2018 मध्ये या मॅगझिनने 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत दीपिकाच्या नावाचा समावेश केला होता. 1976 मध्ये मॅगझिनच्या मुखपृष्ठावर पहिल्यांदा परवीन बाबीला स्थान मिळाले होते. यानंतर 2003 मध्ये ऐश्वर्या राय टाइम मॅगझिनच्या मुखपृष्ठावर दिसली. 2004 मध्ये शाहरुख खान, 2012 मध्ये आमिर खान आणि 2016 मध्ये प्रियांका चोप्रा यांनी टाइम मासिकाच्या मुखपृष्ठावर स्थान मिळवले.

ग्लोबल इव्हेंट्समध्ये दीपिका पदुकोणचा जलवा
दीपिका पदुकोणने जागतिक व्यासपीठावर वर्चस्व गाजवले आहे. काही दिवसांपूर्वीच तिने ऑस्कर 2023 मध्ये प्रेझेंटर ही भूमिका पार पाडली. 'ऑस्कर 2023' च्या प्रेझेंटरच्या यादीत दीपिका पादुकोणसह ड्वेन जॉनसन, मायकल बी जॉर्डन, रिज अहमद, एमिली ब्लंट, ग्लेन क्लोज, ट्रॉय कोत्सुर, जेनिफर कोनेली, सॅम्युअल एल जॅक्सन, मेलिसा कॅककार्थी, जो सलदाना, डॉनी येन, जोनाथन मेजर्स आणि क्वेस्टलोव या सेलिब्रिटींचाही समावेश होता. दीपिकापुर्वी 2016 मध्ये प्रियांका चोप्रा आणि 1980 मध्ये माजी मिस इंडिया पर्सिस खंबाट्टा यांनी ऑस्कर अवॉर्ड्समध्ये प्रेझेंटर म्हणून हजेरी लावली होती.Louis Vuitton ब्रॅंडची दीपिका पदुकोण ब्रँड अ‍ॅम्बेसेडर देखील झाली होती.

याशिवाय दीपिकाने गेल्या वर्षी फिफा वर्ल्ड कपची ट्रॉफी जाहीर केली होती. असे करणारी ती पहिली भारतीय ठरली. दीपिकासाठी आणि संपूर्ण भारतासाठी हा अतिशय अभिमानाचा क्षण होता.

दीपिकाचे चित्रपट

दीपिका पदुकोण अलीकडेच शाहरुख खान आणि जॉन अब्राहमसोबत 'पठाण' या ब्लॉकबस्टर चित्रपटात झळकली होती. 'पठाण'ने जगभरात 1050 कोटींहून अधिक कलेक्शन करून इतिहास रचला आहे. आता दीपिका पदुकोण 'प्रोजेक्ट के' आणि 'फायटर' या आगामी चित्रपटात दिसणार आहे.