आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दीपिका पदुकोणचे ड्रग्ज कनेक्शन:'माल है क्या' विचारलेल्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपची स्वतः अ‍ॅडमिन होती दीपिका; इंडस्ट्रीतील अनेकजण या ग्रुपशी होते जुळलेले

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
दीपिकाचा हा फोटो 2017 चा असून मुंबईतील कोको बारच्या बाहेरचा आहे. यावरुन दीपिका नेहमी येथे येत असे, असे स्पष्ट होते. दीपिकाने आपल्या चॅटमध्येदेखील या बारचा उल्लेख केला होता.
  • दीपिका पदुकोणने ज्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये 'हॅश' (हशीश) आणि 'माल है क्या' विचारले होते, तो व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप 2017 मध्ये तयार झाला होता.
  • सूत्रांच्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वीच हा ग्रुप डिलीट करण्यात आला होता. यात अनेक नामवंत स्टार्स आणि त्यांचे मॅनेजर्स संबंधित होते.

ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री दीपिका पदुकोणविषयी नवीन खुलासे केले जात आहेत. 2017 च्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये दीपिकाने 'हॅश' (हशिश) आणि 'माल है क्या?'ची विचारणा केली होती, त्या ग्रुपची अ‍ॅडमिन स्वतः दीपिका असल्याचे आता समोर आले आहे. सूत्रांनी भास्करला सांगितले की, दीपिकाशिवाय तिची मॅनेजर करिश्मा प्रकाश आणि रिया चक्रवर्तीची मॅनेजर जया साहा या देखील या ग्रुपच्या अ‍ॅडमिन होत्या. काही महिन्यांपूर्वीच हा ग्रुप डिलीट करण्यात आला होता. या ग्रुपमध्ये बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी आणि त्यांचे मॅनेजरदेखील अ‍ॅड होते.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोला (एनसीबी) या ग्रुपचे अनेक ड्रग चॅट्स मिळाल्या आहेत, त्या आधारावर एनसीबी ड्रग सिंडिकेट ऑपरेट करणा-यांवर गुन्हा दाखल करु शकते.

  • ग्रुपमध्ये होते 12 सदस्य

सूत्रांच्या माहितीनुसार, या ग्रुपमध्ये 12 सदस्य होते. करिश्माने चौकशीत सांगितले की, ती जया साहाच्या अंडर काम करायची. दीपिकाबरोबर तिची अनेकदा बातचीत झाली होती. जया आणि दीपिका यांची भेटदेखील करिश्माने करुन दिली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, करिश्माने दीपिकासाठी ड्रग्ज खरेदी केल्याची कबुली दिली आहे. ग्रुप चॅटमध्ये असे दिसून आले की सेलिब्रिटी ड्रग्जची खरेदी त्यांच्या स्टाफ किंवा मॅनेजर यांच्यामार्फत करायचे.

  • करिश्माने कबूल केले- दीपिकाने या ग्रुपमध्ये सामील केले होते

करिश्मा प्रकाशची एनसीबीने चौकशी केली. सुरुवातीला तिने तिच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. सूत्रांच्या माहितीनुसार, करिश्माची विचारपूस सुरु होताच तिला रडू कोसळले. जेव्हा एनसीबीने तिचे या ग्रुपसोबत संबंध असल्याचे पुरावे तिच्यासमोर ठेवले तेव्हा तिने दीपिकाविषयी अनेक मोठे खुलासे केले. करिश्मा म्हणाली की, दीपिकाने तिला जबरदस्तीने या ग्रुपमध्ये जोडले होते. ग्रुपमधील दीपिका आणि करिश्मा प्रकाश यांच्यातील संभाषण समोर आले होते. जया करिश्माची वरिष्ठ सहकारी आहे.

दीपिका आणि करिश्मा यांच्यातील संभाषण

सकाळी 10:04 वाजता : दीपिका करिश्माला विचारते, 'तुझ्याकडे माल आहे का?'

10:05 वाजताः करिश्मा लिहिते, 'माझ्याकडे आहे, पण घरी आहे. मी वांद्रेमध्ये आहे.'

10:05 वाजताः पुढच्या चॅटमध्ये करिश्मा लिहिते, "तुला हवे असल्यास मी अमितला सांगेन." (अमित कोण आहेत, हे स्पष्ट झाले नाही.)

10:07 वाजता: दीपिका लिहिते, 'Yes!! Pllleeeeasssee..'

10:08 वाजता: करिश्मा लिहिते, "अमितजवळ आहे. तो घेऊन येत आहे."

10:12 वाजता: दीपिका लिहिते, 'हॅश न?' पुढच्या चॅटमध्ये ती लिहिते, 'वीड (गांजा) नाही?'

10: 14 वाजता: करिश्मा लिहिते, 'तू कोकोला किती वाजता पोहचणार आहे?' (कोको मुंबईतील एक बार आहे.)

10: 15: दीपिका लिहिते, '11:30 किंवा 12 पर्यंत'.

10: 15 वाजता: दीपिका पुढे लिहिते, 'शैल* तिथे किती वाजता पोहोचेल? (शैल कोण आहे, हे स्पष्ट नाही.)

त्यावर करिश्मा लिहिते, 'मला वाटते त्याने 11:30 वाजता म्हटले होते कारण 12 वाजता त्या दुस-या ठिकाणी पोहोचायचे होते.'

या गंभीर कलमांतर्गत गुन्हा नोंदवला जाऊ शकतो

  • कलम 8 (सी): जाणूनबुजून अशी मालमत्ता खरेदी करणे किंवा त्याचा वापर करणे, जे या कायद्याचे उल्लंघन करणारे ठरेल.
  • कलम 20 (B) (ii): जर कुणी अल्प प्रमाणात बंदी असलेले ड्रग्ज बनवतो, स्वतःजवळ बाळगतो, विक्री करतो, खरेदी करतो किंवा त्याचा वापर करताना आढळतो.
  • कलम 29: कट रचणे किंवा एखाद्याला ड्रग्ज घेण्यास प्रवृत्त केल्यासंदर्भात दोषी आढळल्यास शिक्षेची तरतूद आहे.
  • कलम 22 : ड्रग्जच्या कमी क्वांटीटीसाठी एक वर्षाची शिक्षा, जास्त प्रमाणात असल्यास दहा वर्षांची आणि व्यावसायिकरित्या वापरल्यास 20 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.
  • कलम 27 A: बंदी असलेल्या ड्रग्जसंदर्भात प्रोत्साहन देण्यासाठी किंवा मदत करण्यासाठी किमान 10 वर्षे आणि जास्तीत जास्त 20 वर्षांच्या शिक्षेची तरतूद. कोर्टाची इच्छा असल्यास ते दोन लाख रुपयांहून अधिक दंड देखील आकारू शकते.

करिश्माच्या माध्यमातून ड्रग्ज कनेक्शन दीपिकापर्यंत पोहोचले

दीपिकाची मॅनेजर म्हणून काम करणारी करिश्मा प्रकाश 'क्वान' नावाच्या सेलिब्रिटी मॅनेजमेंट कंपनीत काम करते. ही कंपनी 40 हून अधिक बॉलिवूड सेलिब्रिटींना टॅलेंट मॅनेजर पुरवते. रिया चक्रवर्तीची मॅनेजर जया साहा ही देखील याच कंपनीत काम करते. जया करिष्माची सीनिअर आहे. एनसीबी, सीबीआय आणि ईडीच्या पथकाने अनेकदा जयाची चौकशी केली. चौकशीदरम्यान एनसीबीला जया आणि करिश्मा यांच्यातील चॅटसंदर्भात माहिती मिळाली. यानंतर हे प्रकरण दीपिकापर्यंत पोहोचले.

दीपिकाचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट असे एक्सट्रॅक्ट झाले

पोलिस खात्याशी संबंधित एका अधिका्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दैनिक भास्करला सांगितले की, चॅटचे स्वरूप पाहून हे दीपिकाचे ओरिजिनिल चॅट आहेत, असे म्हटले जाऊ शकते. या चॅट्सच्या खाली लिहिलेले सोर्स हे सिद्ध करतात की ते दीपिका किंवा तिच्या मॅनेजरच्या मोबाइल फोनवरून नव्हे तर सॉफ्टवेअरच्या मदतीने एक्सट्रॅक्ट केले गेले आहेत. सामान्यत: केंद्रीय अन्वेषण एजन्सी अशा पद्धतीने चॅट्स रिट्रीव्ह करु शकतात.