आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण:आज पुन्हा एकदा NCB दीपिकाची माजी मॅनेजर करिश्मा प्रकाशची चौकशी करणार, बुधवारी तब्बल सात तास झाली कसून चौकशी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबई सेशन कोर्टाने करिश्मा प्रकाशला 7 नोव्हेंबरपर्यंत अटक करू नये, असा आदेश दिला आहे.

एनसीबीने अभिनेत्री दीपिका पदुकोणची माजी मॅनेजर करिश्मा प्रकाश हिला ड्रग्स प्रकरणात चौकशीसाठी आज पुन्हा एकदा बोलावले आहे. बुधवारी तिची सुमारे 7 तास चौकशी करण्यात आली. तिला मंगळवारी मुंबई सेशन कोर्टाने एनसीबीसमोर हजर होण्यास सांगितले होते. मागील रविवारी तिने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता त्यानंतर विशेष कोर्टाने तिला 7 नोव्हेंबरपर्यंत अटक करुन नये, असा आदेश दिला होता.

गेल्या महिन्यात झालेल्या छाप्यांदरम्यान एनसीबाला करिश्मा प्रकाशच्या घरातून चरस (हॅश / हॅशिश) आणि सीबीडी ऑइलच्या बाटल्या मिळाल्या होत्या. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार करिश्माला चौकशीदरम्यान तिच्या घरात सीबीडी ऑइल आणि हशीश कुठून आणि कसे आले? यासंदर्भात विचारणा करण्यात आली.

दीपिकाचा या तपासणीशी काही संबंध नाहीः क्वान
सूत्रांनी पुढे सांगितले की, एनसीबीने तिला तिच्याशी संबंधित असलेल्या ड्रग्ज पेडलर्सची नावेही विचारली आहेत. यापूर्वी क्वान टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विजय सुब्रमण्यम यांनी एका निवेदनात म्हटले की, करिश्मा प्रकाश हिने 21 ऑक्टोबरला राजीनामा दिला होता आणि तो स्वीकारण्यात आला आहे.

त्यांनी सांगितल्यानुसार, करिश्माचा आता एजन्सी आणि दीपिका पदुकोण यांच्यासह कोणत्याही कलाकाराशी काही संबंध नाही. करिश्मा प्रकाशविरोधात सध्या सुरू असलेला तपास वैयक्तिकरित्या सुरू आहे. आमची मीडिया हाऊसेस आणि पत्रकारांना विनंती आहे की, या विषयावर रिपोर्टिंग करता ही वस्तुस्थिती लक्षात ठेवावी.

यापूर्वी दोनदा करिश्माचा जबाब नोंदवला गेला
एनसीबीने यापूर्वी सप्टेंबरमध्ये करिश्मा प्रकाश हिचा जबाब नोंदवला होता. दीपिका व्यतिरिक्त एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांचीही चौकशी केली आहे. एनसीबीने तिन्ही अभिनेत्रींचे फोनही जप्त केले आणि त्यांना फॉरेन्सिक विभागात तपासासाठी पाठवले.

एनसीबीने अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) च्या विनंतीवरून गुन्हा दाखल केला होता. कथित ड्रग्ज चॅट्सच्या आधारावर ऑगस्टमध्ये ड्रग्जविषयी चर्चा सुरु झाली होती. सुशांत हा 14 जून रोजी मुंबईतील त्यांच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यूची एनसीबी, सीबीआय आणि ईडी चौकशी करत आहेत.