आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूडमध्ये ड्रग्जचा सापळा:दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाशच्या घरी NCB चा छापा, घरातून ड्रग्ज जप्त

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • काही दिवसांपूर्वीच दीपिका आणि करिश्मा यांच्यातील ड्रग्जविषयीचे संभाषण समोर आले होते. हे संभाषण 28 ऑक्टोबर 2017 रोजी झाले होते.

अभिनेत्री दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाशच्या घरावर मंगळवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने छापा टाकला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करिश्माच्या घरातून अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. त्यानंतर आता तिला पुढील चौकशीसाठी एनसीबीने समन्स बजावले आहे. एनसीबीने यापूर्वी दोनदा करिश्मावरची चौकशी केली होती. एकदा करिश्माला दीपिका पदुकोणच्या समोर बसवून प्रश्नोत्तरे केली गेली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीने धाड टाकली तेव्हा करिश्मा घरी नव्हती. त्यानंतर एनसीबीने तिच्या घरी समन्स चिकटवले. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रग्ज पॅडलरने चौकशीदरम्यान करिश्माचे नाव घेतले होते.

करिश्माला बुधवारी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे - विभागीय संचालक

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे म्हणाले की, "आम्ही करिश्माचे शेजारी, तिचे ऑफिस आणि ओळखीच्या सर्वांना तिच्या समन्सविषयी कळवले आहे. बुधवारी तिला चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात बोलवण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे. याहून अधिक माहिती शेअर करू शकत नाही."

दीपिका आणि करिश्माचे ड्रग्ज चॅट समोर आले होते
काही दिवसांपूर्वी दीपिका आणि करिश्मा यांच्यातील ड्रग्जबाबतचे संभाषण समोर आले होते. दीपिका आणि करिश्मा यांच्यातील हे संभाषण 28 ऑक्टोबर 2017 रोजी झाले होते. करिश्माशी झालेल्या संभाषणात दीपिकाने 'हॅश' आणि 'वीड' सारखे शब्द वापरले होते. बंदी असलेल्या हॅशला ड्रग्जच्या भाषेत चरस म्हटले जाते.

या दोघींमधील संभाषणात 'हॅश' आणि 'वीड'चा वापर कुणासाठी केला गेला, हे स्पष्ट झाले नाही. यात ड्रग्जच्या प्रमाणाचाही उल्लेख नाही. मात्र दीपिकाच्या अडचणीत भर घालण्यासाठी हे व्हॉट्सअॅप चॅट्स पुरेसे आहेत.