आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बेशरम रंग' या वादग्रस्त गाण्यावर दीपिकाची पहिलीच प्रतिक्रिया:म्हणाली- गाण्याचे शूटिंग सोपे नव्हते, यासाठी मला खूप मेहनत घ्यावी

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा 'पठाण' चित्रपट 25 जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी, दीपिकाने चित्रपटातील वादग्रस्त गाणे बेशरम रंग या गाण्यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. गाण्याच्या शूटिंगदरम्यान चित्रपटाच्या टीमने अत्यंत कठीण परिस्थितीत काम केल्याचा खुलासा तिने केला.

'बेशरम रंग' गाण्याचे शूटिंग खूप अवघड परिस्थितीत केले
दीपिका म्हणाली, 'पठाण चित्रपटातील दोन्ही गाणी माझी आवडती आहेत. त्यापैकी एक निवडणे खूप कठीण आहे. दोन्हीही गाणी वेगळी आहेत. पण बेशरम रंगसाठी मला खूप मेहनत घ्यावी लागली. हे एक प्रकारचे माझे सोलो गाणे आहे. आम्ही ज्या ठिकाणी बेशरम रंगचे शूटिंग करत होतो त्या ठिकाणी ते शूट करताना खूप अडथळे येत होते. आम्ही अतिशय कठीण परिस्थितीत काम करत होतो. आम्हाला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. कारण तिथे वारा सुटल्यामुळे फार थंडी वाजत होती.'

मी दोन्ही गाणी खूप एन्जॉय केली आहेत
दीपिका पुढे म्हणाली, 'या दोन्ही गाण्यांचे शूटिंग करताना मला खूप मजा आली. दुसरे गाणे शाहरुख खानसोबत आहे. जेव्हा आम्ही एकत्र नाचतो तेव्हा आम्हाला खूप आनंद होतो. डान्स करताना आम्ही स्टेप्सचा फार टेक्निकली विचार केलेला नाही. आम्ही फक्त स्टेप्स समजून घेतल्या आणि त्या करताना त्याचा आनंद घेतला. त्यामुळेच दोन्ही गाणी हिट ठरली.'

दीपिकाच हे गाणे करु शकते
काही दिवसांपूर्वी 'बेशरम रंग' गाण्याबद्दल बोलताना शाहरुख खान म्हणाला होता, "दीपिका एक उत्तम अभिनेत्री आहे. अॅक्शन सीन्स करताना ती मला माझ्यापेक्षा वरचढ वाटली. चित्रपटात ती एकीकडे ‘बेशरम रंग’सारखे गाणे करत आहे आणि दुसरीकडे एका मुलाला उचलून त्याला मारताना दिसत आहे. मला वाटते दीपिकासारखी अभिनेत्रीचं ‘बेशरम रंग’ या गाण्याला इतक्या चांगल्याप्रकारे सादर करू शकते."

स्पेनमध्ये झाले 'बेशरम रंग'चे शूटिंग
पठाणच्या दोन्ही गाण्यांमध्ये शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण आहेत. बेशरम रंग या गाण्याचे चित्रीकरण स्पेनमध्ये झाले आहे. याचे नृत्यदिग्दर्शन वैभवी मर्चंटने केले आहे. चित्रपटात शाहरुख-दीपिका सोल्जरच्या भूमिकेत आहेत, जे देशाला दहशतवाद्यांपासून वाचवतात. जॉन अब्राहम चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत असून तो भारतावर हल्ला करण्याची योजना आखतो. या चित्रपटात डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत रिलीज होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...