आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा13 मार्च रोजी लॉस एंजेलिस येथे 95 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. यंदाच्या सोहळ्याला बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण प्रेझेंटर म्हणून पोहोचली होती. भारताला यंदाच्या सोहळ्यात दोन ऑस्कर पुरस्कार मिळाले. अवॉर्ड आणि दीपिकाच्या हजेरीमुळे यंदाचा ऑस्कर सोहळा भारतात चर्चेत राहिला. पण परदेशी मीडियाने दीपिका पदुकोणची चुकीची ओळख सांगितली.
एका परदेशी मीडिया चॅनलने तिची ओळख हॉलिवूड मॉडेल कॅमिला अॅल्वेस म्हणून सांगितली. परदेशी मीडियाच्या या माहितीवर दीपिकाचे चाहते संतापले आणि त्यांनी ट्विटर त्यांना चांगलेच सुनावले आहे. कॅमिला अॅल्वेस ही ब्राझीलची मॉडेल आहे.
दीपिका स्वतः आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चेहरा असल्याचे चाहत्यांनी म्हटले आहे. हा निव्वळ वर्णद्वेष असल्याचेही अनेकांचे मत आहे.
दीपिकाचे चाहते संतापले
गेट्टी मीडिया चॅनलला टॅग करत एका यूजरने लिहिले, "दीपिका स्वतः आंतरराष्ट्रीय सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध चेहरा आहे. असे असूनही परदेशी मीडिया तिला ओळखत नाही, हा निव्वळ वर्णद्वेष आणि मीडिया चॅनलचा निष्काळजीपणा आहे." आणखी एका यूजरने लिहिले, "दोन महिन्यांपूर्वी तिच्या चित्रपटावर भारतात बहिष्कार घालण्यात आला होता आणि आज ती ऑस्करमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. आज बॉयकॉट गँगला शरमेने मान घालावी लागली."
आणखी एका यूजरने लिहिले, "ही दीपिका पदुकोण आहे. पण ती कॅमिला अॅल्वेस असल्याचा तुम्हाला गैरसमज झाला आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की दीपिका खूप प्रसिद्ध आहे. तिचे 72 मिलियन फॉलोअर्स आहेत आणि तिने अनेक पुरस्कारही जिंकले आहेत."
ब्लॅक गाऊनमध्ये दीपिकाने वेधले सगळ्यांचे लक्ष
दीपिकाने 2023 च्या ऑस्कर कार्पेटवर लुई व्हिटॉन क्लासिक ऑफ-शोल्डर गाऊनमध्ये हजेरी लावली. तिच्या ब्लॅक ड्रेस आणि सौंदर्याचे खूप कौतुक झाले. यावेळी दीपिका खूप आत्मविश्वासाने स्टेजवर पोहोचली आणि तिथे ‘आरआरआर’चे ‘नाटू-नाटू’ गाणे प्रेझेंट केले होते.
ऑस्करमध्ये प्रेझेंटर म्हणून सहभागी होणारी दीपिका ही तिसरी महिला आहे. याआधी पारसी खंबाटा आणि प्रियांका चोप्रा प्रेझेंटर म्हणून ऑस्करपर्यंत पोहोचल्या आहेत. दीपिकाच्या या खास कामगिरीबद्दल सामान्यांसह सेलिब्रिटींसह अनेकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आलिया भट्ट, समांथा रुथ प्रभूपासून कंगना रनोटपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.