आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण नुकतीच टाइम मासिकाच्या मुखपृष्ठावर दिसली. दरम्यान, दीपिकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडिओत दीपिका टाइम मॅगझिनसाठी मुलाखत देतेय. याचवेळी रणवीर तिथे पोहोचतो आणि तिला सरप्राइज देतो.
रणवीरने दीपिकाला किस केले
या व्हिडिओमध्ये दीपिकाला तिच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला जात होता. याचवेळी रणवीर तिथे पोहोचला. रणवीरला असे अनपेक्षितपणे आलेले पाहून दीपिकाला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. यावेळी रणवीर दीपिकाला किसही केले.
या व्हिडिओत दीपिका रणवीरला तू अचानक इथे कसा आला?, असा प्रश्न विचारताना दिसली. रणवीरने दीपिकाने सांगितले की, तो इथे शेजारी शूटिंग करत होता. त्यानंतर रणवीर दीपिकाला बाय म्हणत तिथून निघत असताना दीपिका त्याला सांगते की, मला इथे आपल्या लग्नाबाबत प्रश्न विचारला जातोय.
लग्नाच्या प्रश्नावर रणवीरने दिले उत्तर
लग्नाच्या प्रश्नावर रणवीर आणि दीपिका सांगतात की, त्यांच्या लग्नाला साडेचार वर्षे झाली आहेत. पण ते 10 ते 11 वर्षांपासून एकत्र आहेत. या प्रश्नाचे उत्तर देताना हे जोडपे एकमेकांचा हात धरताना दिसले.
त्यानंतर दीपिका हसली आणि म्हणाली, ' हे काय करतोय?' ज्याला रणवीरने उत्तर दिले की, 'मी फक्त हाय म्हणायला आलो होतो'. रणवीर इथे येणार याची अजिबात कल्पना नव्हती, असे दीपिकाने यावेळी स्पष्ट केले.
दीपिकाला लग्नाविषयी विचारण्यात आला प्रश्न
टाइम मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत दीपिका तिच्या लग्नाबद्दल बोलताना म्हणाली, 'मला आणि माझ्या नवऱ्याला एकत्र वेळ घालवायला आवडते. मी माझ्या बेस्ट फ्रेंडशी लग्न केले आहे. मला वाटते की आम्ही एकमेकांबद्दल खूप क्रेझी होत. आम्ही जवळपास 10 वर्षांपासून एकमेकांना ओळखतो, माझी ती हॅपी प्लेस आहे,' असे ती म्हणाली.
घटस्फोटाची पसरली होती अफवा
काही महिन्यांपूर्वी रणवीर-दीपिकाच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचे वृत्त आले होते. दोघे घटस्फोट घेणार असल्याचेही म्हटले गेले होते. मात्र दोघांनी या वृत्तावर कधीही प्रतिक्रिया दिली नाही.
दीपिकाचे चित्रपट
दीपिका पदुकोण अलीकडेच शाहरुख खान आणि जॉन अब्राहमसोबत 'पठाण' या ब्लॉकबस्टर चित्रपटात झळकली होती. 'पठाण'ने जगभरात 1050 कोटींहून अधिक कलेक्शन करून इतिहास रचला आहे. आता दीपिका पदुकोण 'प्रोजेक्ट के' आणि 'फायटर' या आगामी चित्रपटात दिसणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.