आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिनेजगतात सर्वोच्च समजला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा येत्या 12 मार्च रोजी रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार 13 मार्च रोजी सकाळी 5.30 वाजता हा सोहळा बघता येणार आहे. यंदाचे ऑस्कर सोहळ्याचे हे 95 वे वर्ष आहे. दरम्यान बॉलिवूडसाठी एक आनंदाची बातमी आहे. बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण हिला यंदाच्या सोहळयात एक मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. या सोहळ्यात दीपिका पुरस्कार जाहीर करताना दिसणार आहे. तिने स्वत: सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे.
दीपिका पदुकोण ऑस्कर पुरस्काराशी जोडली जाणार आहे. दीपिकाने नुकतीच इन्स्टाग्रामवर याची माहिती दिली आहे. तिने स्वत: ऑस्कर पुरस्कार जाहीर करणाऱ्यांची नावे शेअर केली आहेत. रिझ अहमद, एमिली ब्लंट, ग्लेन क्लोझ, जेनिफर कॉनेली, एरियाना डीबोस, सॅम्युअल एल जॅक्सन, ड्वेन जॉन्सन, माइकल बी जॉर्डन, ट्रॉय कोत्सुर, जोनाथन मेजर्स, मेलिसा मॅक्कार्थी, जेनेल मोनाए, दीपिका पदुकोण, क्वेस्टलव, झो सलदाना आणि डोनी येन हे कलाकार यंदाच्या सोहळ्यात ऑस्कर पुरस्कार जाहीर करताना दिसणार आहेत.
रणवीरसह सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव दीपिकाने शेअर केलेल्या या आनंदाच्या बातमीनंतर तिच्यावर सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव होतोय. तिचा पती आणि अभिनेता रणवीर सिंगनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. रणवीरने हाताने टाळ्या वाजवतानाचे इमोजी शेअर करत दीपिकाचे कौतुक केले आहे. नेहा धुपियानेही तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा भारतासाठी फारच खास ठरणार आहे. या वर्षी ‘चेल्लो शो’, ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला ऑस्करसाठी नामांकन मिळाले आहे. त्यामुळे सर्व भारतीयांच्या नजरा या सोहळ्याकडे लागल्या आहेत.
अलीकडेच 'पठाण'मध्ये दिसली दीपिका पदुकोण
दीपिका अलीकडेच ‘पठाण’ या चित्रपटात शाहरुख खान आणि जॉन अब्राहमसोबत झळकली. हा चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने आत्तापर्यंत देशभरात 500 कोटींची तर जगभरात 1000 कोटींहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवरील सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.