आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या चौकशीसाठी गेल्या महिन्यात मुंबईला परतलेली दीपिका पदुकोण पुन्हा एका आपल्या कामावर परतली आहे. दीपिका सध्या गोव्यात असून येथे तिने शकुन बत्रांच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू केले आहे. या चित्रपटात अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदीसुद्धा तिच्यासह महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. वृत्तानुसार 8 ऑक्टोबर रोजी दीपिका गोव्यात पोहोचली आणि चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली. तिने सिद्धांत आणि अनन्यासोबत एकूण सीन शूट केले आहे. ड्रग्ज चॅटमध्ये नाव आल्यापासून दीपिकाने स्वतःला सध्या सोशल मीडियापासून दूर ठेवले आहे.
खरं तर हा चित्रपट मार्च 2020 मध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु कोरोनामुळे त्याचे काम थांबविण्यात आले होते. अद्याप नाव न ठरलेल्या या चित्रपटाचे शूटिंग जवळपास 6 महिन्यांपासून रखडले होते. मात्र, या विलंबाने शकुन बत्रा यांना चित्रपटाच्या पटकथेवर काम करण्याची अधिक संधी मिळाली. सुरुवातीला श्रीलंकेत चित्रपटाचे शूटिंग करण्याचे ठरवण्यात आले होते. परंतु कोरोनामुळे हे शक्य झाले नाही. त्यानंतर गोव्यात चित्रीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. उर्वरित शूटिंग मुंबईतील एका स्टुडिओत होणार आहे.
सुशांत प्रकरणात सुरू असलेल्या चौकशीत ड्रग्ज कनेक्शनमध्ये दीपिकाचे नाव समोर आले होते. त्यानंतर 24 सप्टेंबर रोजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) दीपिकाला चौकशीसाठी नोटीस पाठवली होती.
2017 च्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये दीपिकाने 'हॅश' (हशिश) आणि 'माल है क्या?' सारख्या ओळी लिहिल्या होत्या, ती या ग्रुपची स्वतः अॅडमिन असल्याचे समोर आले आहे. दीपिकाशिवाय तिची मॅनेजर करिश्मा प्रकाश आणि रिया चक्रवर्तीची मॅनेजर जया साहा या देखील या ग्रुपच्या अॅडमिन होत्या. हा ग्रुप काही महिन्यांपूर्वीच डिलीट करण्यात आला होता. या ग्रुपमध्ये अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि त्यांचे मॅनेजर अॅड होते. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला (एनसीबी) या ग्रुपचे ड्रग्ज संबंधित अनेक चॅट्स मिळाले आहेत. त्या आधारे एनसीबी ड्रग्ज सिंडिकेट ऑपरेट केल्याबद्दल गुन्हा नोंदवू शकतो.
या चित्रपटाशिवाय दीपिका पदुकोण कबीर खान यांच्या आगामी '83' या चित्रपटात झळकणार आहे. यात रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहे. तो कपिल देवची व्यक्तिरेखा साकारत आहे. कपिल देवची पत्नी रोमीच्या भूमिकेत दीपिका आहे. याशिवाय ‘द इंटर्न’ या हॉलिवूड चित्रपटाच्या रिमेकमध्ये आणि शाहरुख खानच्या 'पठाण'मध्येही दीपिका मुख्य भूमिका साकारत आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.