आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिका झाली कोरोनामुक्त:बंगळुरूहून मुंबईला परतली दीपिका पदुकोण, एअरपोर्टवर पत्नीसोबत दिसला रणवीर सिंह; संपूर्ण कुटुंबाला झाली होती कोरोनाची लागण

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दीपिका आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी गेली होती बंगळुरुला

19 दिवसांपूर्वी अभिनेत्री दीपिका पदुकोण, तिचे आईवडील आणि धाकट्या बहिणीला कोरोनाची लागण झाली होती. यानंतर, 13 मे रोजी या सर्वांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची बातमी समोर आली होती. आता दीपिका कोरोनातून बरी होऊन बंगळुरुहून मुंबईला परतली आहे. रविवारी ती मुंबई विमानतळावर दिसली. यावेळी तिचा पती रणवीर तिच्यासोबत दिसला. दरम्यान, दोघांचे फोटो क्लिक करणा-या फोटोग्राफर्सनी दीपिकाला तिच्या प्रकृतीविषयी विचारणा केली असता, तिने केवळ थम्स अप केला.

दीपिका आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी गेली होती बंगळुरुला
काही दिवसांपूर्वी दीपिका तिच्या कुटुंबाला भेटण्यासाठी बंगळुरुला गेली होती. येथेच तिलादेखील कोरोना संसर्ग झाला होता. तिचे वडील आणि माजी राष्ट्रीय बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांना संसर्ग झाल्यानंतर बंगळुरूच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर दीपिका तिच्या आई आणि बहीणसह होम आयसोलेशनमध्ये होती.

दीपिकाने अलीकडेच सुरु केले होते मानसिक आरोग्यावर काम
दीपिका पदुकोणने कोरोना महामारीच्या काळात मानसिक आरोग्याच्या समस्येने ग्रस्त लोकांसाठी अलीकडेच काही हेल्पलाईन नंबर शेअर केले होते. जेणेकरून या काळात लोक एकाकीपणाच्या भावनेला बळी पडणार नाहीत आणि सोबतच आत्महत्येसारखे विचार त्यांच्या मनात येणार नाहीत. याविषयी दीपिकाने लिहिले होते - आपल्यातील लाखो लोक, अगदी मी आणि माझे कुटुंबसुद्धा एकमेकांपासून दूर राहून संघर्ष करीत आहेत. आपण हे विसरू नये की, सद्य परिस्थितीत सर्वांनी स्वतःची इमोशनल काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. लक्षात ठेवा, आपण एकटे नाहीत. या संकटात आपण सर्वजण एकत्र आहोत.

बातम्या आणखी आहेत...