आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा आगामी पठाण हा चित्रपट रिलीजपूर्वीच वादात सापडला आहे. चित्रपटातील बेशरम रंग हे गाणे रिलीज झाले आणि वादाला तोंड फुटले. या गाण्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचा दावा करण्यात येत आहे. या गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरुन हे वादंग उठले आहे. पण दीपिकाने या गाण्यामध्ये परिधान केलेली बिकिनी कुणी डिझाइन केली हे आता समोर आले आहे.
'बेशरम रंग' या गाण्यात दीपिका पदुकोण आणि शाहरुख खान यांनी परिधान केलेले आउटफिट्स देशातल्या टॉपच्या स्टायलिशने म्हणजे शालीना नथानीने डिझाइन केले आहेत. शालीना इंडस्ट्रीत स्टार्सना हटके लूक देण्यासाठी ओळखली जाते. तोच तिचा स्पेशल टच 'बेशरम रंग' गाण्यात दीपिका-शाहरुखचे आउटफिट पाहून समोर आला आहे.
ईटाइम्सच्या वृत्तानुसार, शालीना बेशरम रंग हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर खूप खुश आहे. यासंदर्भात शालीना म्हणाली, ''दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने मला गाण्याचा संदर्भ सांगितला होता. ते कोणत्या पार्श्वभूमीवर घडतंय, स्टोरीशी त्याचे कनेक्शन काय आहे याचा अंदाज त्याने मला दिला होता. 'बेशरम रंग' या गाण्यात दीपिकाला एकदम बिनधास्त अंदाजात मला दाखवायचे होते. चित्रपटाच्या कथेशी निगडीत गाणे असल्याने ते हटके झाले पाहिले असे सिद्धार्थ आनंदने मला सांगितले होते.''
शालीनाच्या म्हणण्यानुसार, ''प्रेक्षकांनी कधीही न पाहिलेल्या लूकमध्ये दीपिका आणि शाहरुखला दाखवायचे होते. त्यासाठी मला दोन्ही स्टार्सचे आऊटफिट एकदम हटके हवे होते. दीपिकाने ज्या पद्धतीचे स्वीमूट घाटले आहेत, त्यासाठी जे रंग वापरलेत ते खूपच वेगळे आहेत. शाहरुखला देखील काही अॅक्सेसरीज घालायला लावून कूल दाखवण्याचा प्रयत्न केला आहे," असे शालीना म्हणाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.