आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाराजी:सुशांतचे व्हिडीओ शेअर करणा-या पापाराजीवर भडकली दीपिका, म्हणाली -  तुम्ही कुटुंबीयांची लिखित परवानगी घेतली होती का?

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दीपिकाने पापाराझीला फटकारले आहे.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर त्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करुन पैसे कमावणा-या पापाराजीवर दीपिका पदुकोण चिडली आहे. सुशांतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करताना त्याच्या कुटुंबीयांची लिखित परवानगी घेतली होती का असा सवाल तिने केला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण

बॉलिवूडच्या एका पापाराझीने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सुशांतच्या पार्थिवाला रुग्णालयातून स्मशानभूमीकडे नेतानाचा व्हिडीओ पोस्ट केला होता. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये पापाराझीने लिहिले होते, ‘माझ्या लिखित परवानगीशिवाय कोणीही मी काढलेले फोटो किंवा व्हिडीओ दुसरीकडे वापरू शकत नाही.’

यावर दीपिकाने कमेंटमध्ये त्याला प्रश्न विचारला,‘बरोबर. पण त्याच्या किंवा त्याच्या कुटुंबीयांच्या लिखित परवानगीशिवाय तुम्ही हे व्हिडीओ शूट करून पोस्ट करणे आणि त्यातून पैसे कमावणे योग्य आहे का?’

पोस्टवरील त्यापुढील कमेंट्समध्ये नेटकऱ्यांनी दीपिकाचे कौतुक केले. ‘तू बरोबर बोललीस’ असे म्हणत अनेकांनी तिला पाठिंबा दिला.

बातम्या आणखी आहेत...