आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादीपिका पदुकोण सध्या तिच्या आगामी 'पठाण' या चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यावरून वादात सापडली आहे. सोशल मीडियासह सर्व स्तरातून या गाण्यावर टीका होत आहे. दरम्यान, दीपिका मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. दीपिका कतारला रवाना झाली आहे. ती FIFA विश्वचषक 2022 च्या फायनलमध्ये सहभागी होणार आहे. यावेळी व्हाइट शर्टसह लाँग जॅकेट आणि पॅंटमध्ये ती खूपच स्टायलिश दिसली. तिने डार्क सनग्लासेस लावले होते.
दरम्यान, पापाराझींनी दीपिकाला तिचे 'बेशरम रंग' हे गाणे आवडले, असे सांगितले. यावर दीपिका हसताना दिसली. सध्या 'पठाण' चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यावरून देशभरात गोंधळ सुरू आहे. या गाण्यात दीपिकाने परिधान केलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीमुळे हा वाद सुरु झाला आहे. या भगव्या रंगाचा संबंध धर्माशी जोडण्यात आला आहे.
'पठाण'वर बहिष्कार घालण्याची मागणी
'बेशरम रंग' या गाण्यात दीपिका पदुकोणचा ग्लॅमरस अवतार बघायला मिळाला. गाण्यात दीपिका-शाहरुखचा इंटिमेट डान्स पाहून लोकही हैराण झाले आहेत. बॉलिवूडचा बादशाह आणि दीपिकाचा हा अंदाज अनेकांना पसंत पडलेला नाही आणि चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरू लागली आहे. 'पठाण' हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी रिलीज होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.