आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दीपिका पदुकोणची रणनीती:घराबाहेर हजर असलेल्या मीडियाला चकमा देण्यासाठी दीपिका हॉटेल ताजमध्ये थांबली होती, रात्री उशिरापर्यंत आपल्या लीगल टीमसोबत चर्चाही केली

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
दीपिका पदुकोण शनिवारी सकाळी 9.50 वाजता एनसीबीच्या गेस्टहाऊसमध्ये पोहोचली होती.
  • असा दावा केला जात आहे की, दीपिका हॉटेल ताजमधून छोट्या कारने एनसीबी ऑफिसमध्ये पोहोचली.
  • गुरुवारी दीपिका गोव्याहून मुंबईला पोहोचली होती, तेव्हा मीडिया तिचा पाठलाग करत तिच्या घरापर्यंत पोहोचला होता.

बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनमध्ये नाव पुढे आल्यानंतर अभिनेत्री दीपिका पदुकोण शनिवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोसमोर हजर झाली. वृत्तानुसार, ती थेट तिच्या घरून नव्हे तर दक्षिण मुंबईतील हॉटेल ताज येथून एनसीबी कार्यालयात पोहोचली. असे सांगितले जाते की, पती रणवीर सिंगसोबत शुक्रवारी रात्री दीपिका हॉटेल ताजमध्ये पोहोचली होती. येथेच दोघेही रात्रभर थांबले.

मीडियाला टाळण्यासाठी दीपिकाचा स्मार्ट निर्णय

गुरुवारी रात्री दीपिका गोव्याहून मुंबईला परतली. त्यावेळी मीडिया तिच्या गाडीचा पाठलाग करत तिच्याघरापर्यंत पोहोचला होता. हे पाहून दीपिका आणि रणवीरने मीडिया कव्हरेज टाळण्यासाठी स्मार्ट निर्णय घेतला.

रात्रीच्या वेळी ती आपल्या घरातून हॉटेलमध्ये शिफ्ट झाली आणि तेथून एका छोट्या गाडीतून एनसीबी कार्यालयात पोहोचली. दीपिका आणि रणवीर यांनी शुक्रवारी उशीरा रात्रीपर्यंत आपल्या वकीलांसमवेत चर्चा केली, असा दावाही केला जात आहे.

दीपिकाने ड्रग्ज चॅटबद्दल दिली कबुली

रिपोर्ट्सनुसार, एनसीबीने चौकशीदरम्यान दीपिकाला तिची मॅनेजर करिश्मा समोर काही प्रश्न विचारले आहेत. ‘टाइम्स नाऊ’ने दिलेल्या वृत्तानुसार एनसीबी करत असलेल्या चौकशीमध्ये दीपिकाने, ज्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये माल है क्या असे म्हणत ड्रग्जची मागणी केली गेली होती त्या चॅटचा ती एक भाग असल्याचे कबुल केले आहे. मात्र ड्रग्जचे सेवन केल्याचे नाकारले आहे. रिपोर्ट्सनुसार, एनसीबीच्या हवाल्याने दावा केला जातोय की, दीपिकाने एका विशिष्ट प्रकारची सिगारेट ओढण्याचे कबूल केले आहे.

दीपिकाने सांगितले- संपूर्ण ग्रुप डूप घेतो

दीपिकाने एनसीबीला सांगितले की तिचा संपूर्ण ग्रुप डूप घेतो, जी एक खास प्रकारची सिगारेट आहे. त्यात ब-याच गोष्टी असतात. रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जातोय की, जेव्हा एनसीबीने दीपिकाला चॅटमधील वीड आणि हॅशिश या शब्दांबद्दल विचारले तेव्हा तिने त्याचे स्पष्ट उत्तर दिले नाही. डूपमध्ये ड्रग्जचे प्रमाण असते का, असा प्रश्न दीपिकाला विचारला असता तिने मौन बाळगले, अशीही माहिती समोर आली आहे.