आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूड आणि ड्रग्ज कनेक्शन:दीपिकावर लागलेत इंडस्ट्रीचे 500 कोटी रुपये; संजय दत्तप्रमाणे दीपिकाच्या चित्रपट करिअरचे होणार नाही नुकसान, मात्र जाहिरातींना बसणार फटका

अमित कर्ण. मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमली पदार्थ सेवनाने शिक्षा होत नाही, तज्ज्ञांचा दावा
  • तज्ज्ञांकडून जाणून घेऊयात दीपिकाच्या करिअरवर काय होईल परिणाम

ड्रग्ज प्रकरणात नाव आल्यानंतर दीपिका पदुकोणच्या हातून बऱ्याच जाहिराती सुटल्या आहेत. त्यामुळे तिचे नुकसान होणार आहे. ट्रेड पंडितांनुसार, चित्रपट आणि जाहिराती मिळून इंडस्ट्रीचे 500 कोटी रुपये एकट्या दीपिकावर लागले आहेत. सध्या तिच्या हातात दोन चित्रपट असून याव्यतिरिक्त 33 टक्के जाहिराती आहेत, यातून तिला शंभर कोटी रुपये आले असते.

  • दीपिकाच्या हाती असलेले प्रोजेक्ट्स
प्रोजेक्टकिती कोटी रुपये लागलेत पणाला
निर्माता मधु मंटेनाचा नाव न ठरलेला चित्रपटसुमारे 200 कोटी रुपये
दिग्दर्शक शकून बत्राचा नाव न ठरलेला चित्रपटसुमारे 80-90 कोटी रुपये
33 ब्रॅण्ड एंडोर्समेंटची डीलसुमारे 300 कोटी रुपये
  • चित्रपटाचा निर्मातासुद्धा अडकला ड्रग्ज प्रकरणात

सध्या तिच्याकडे शकुन बत्राचा आणि मधू मंटेेनाचा एक चित्रपट आहे. मधू मंटेना स्वत:ही ड्रग्ज प्रकरणामुळे वादात आहेत. मधूसोबत दीपिका 'द्रौपदी'वर चित्रपट बनवणार होती. तो चित्रपट 200 कोटी रुपयांचा आहे, तर शकुन यांचा चित्रपट 80 ते 90 कोटींचा सांगितला जात आहे.

(ट्रेड अ‍ॅनालिस्ट अतुल मोहन यांच्या मते, दीपिका पदुकोण प्रत्येक एंडोर्समेंटसाठी सुमारे 8-12 कोटी रुपये घेते.)

  • दीपिकाच्या करिअरवर थेट परिणाम होणार -

ट्रेड अ‍ॅनालिस्ट आणि मागील 40 वर्षांपासून डिस्ट्रीब्युशनमध्ये सक्रिय असलेले राज बन्सल म्हणतात, ''दीपिकाच्या करिअरवर याचा प्रभाव तर नक्कीच पडेल. कारण, लोक सध्या याच मुद्द्यावर चर्चा करत आहेत. एवढेच नव्हे तर सुशांत सिंह राजपूतची हत्या काेणी केली यावरही सध्या चर्चा होताना दिसत नाही. सर्व वेळ फक्त ड्रग्ज प्रकरणातील नावांचीच चर्चा आहे. कारण हे दिग्गज कलाकार आहेत त्यामुळे नार्कोटिक्सदेखील यांच्या मागे हात धुऊन लागले आहेत. त्यामुळे दीपिकाच्या चित्रपटाच्या कमाईवर याचा परिणाम होईल.''

  • इतरांपेक्षा दीपिकाची जाहिरातीची कमाई जास्त आहे

ट्रेड पंडित अतुल मोहन सांगतात, “संजय दत्तदेखील ड्रग्ज आणि दहशतवादी कारवायांमध्ये सामील होता. इतके असूनही प्रेक्षकांनी त्याला स्वीकारले. त्यामुळे दीपिकाला चित्रपटांच्या बाबतीत काही नुकसान होणार नाही. पण जाहिरातीच्या पातळीवर नक्कीच शक्य आहे.''

  • जाहिरात कंपन्या दीपिकाची चौकशी संपण्याची वाट पाहतील, मगच निर्णय - पीयूष पांडे, अ‍ॅड गुरू

दीपिका किंवा ज्याचेही नाव या प्रकरणात आले त्यांच्यावर गुन्हा सिद्ध होताच त्यांच्या हातून आधी जाहिराती जातील हे नक्की. अजून तर चौकशीच्या पहिल्या स्टेजवर आहेतत. जी कंपनी समजदार असेल ती चौकशी संपण्याची वाट पाहील. खंर तर सध्या तर शूटिंगदेखील कमी होत आहे. त्यामुळे दीपिकाला घेतलेल्या कंपन्यांनी आपल्या जाहिराती होल्ड केल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...