आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बॉलिवू़ड ड्रग्ज कनेक्शन:NCBच्या समन्सनंतर दीपिका पदुकोण आज गोव्याहून मुंबईला परतणार, 12 वकिलांच्या टीमसोबत चर्चा सुरु; रकुल प्रीत सिंगची समन्स स्वीकारण्यास टाळाटाळ

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 25 सप्टेंबर रोजी दीपिकाला चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे.

सुशांत मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगलची चौकशी करत असलेल्या एनसीबीने अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर आता एकाच वेळी बॉलिवूडच्या चार अभिनेत्रींना चौकशीचे समन्स बजावले आहे. एनसीबीने अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंगला यांना वेगवेगळ्या दिवशी चौकशीसाठी बोलावले आहे. 25 सप्टेंबर रोजी दीपिकाला चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. दीपिका तिच्या एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गोव्यात होती. ती गुरुवारी दुपारी चार्टर्ड विमानाने मुंबईत परतणार असल्याचे वृत्त आहे. तिचा पती आणि अभिनेत्री रणवीर सिंग वकिलांच्या संपर्कात आहे. तब्बल 12 वकिलांची टीम दीपिकासाठी नेमण्यात आली आहे.

  • रिया चक्रवर्तीवर लावलेली कलमे दीपिकावरही!

एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, रिया चक्रवर्ती आणि दीपिका पदुकोन या दोघींच्या प्रकरणात जर कुठूनही त्या एकच सिंडिकेटचा भाग आहे हे सिद्ध झाले तर समान कलमे लागू होऊ शकतात आणि शिक्षा होऊ शकते. रिया चक्रवर्तीचे प्रकरण या प्रकरणाशी जुळते कारण टॅलेंट मॅनेजर जया साह या सर्वांच्या संपर्कात आहे आणि जया साहने ड्रग्ज पुरवठा केल्याची कबुली दिली आहे. दीपिका पदुकोनही ड्रग्ज घेण्याची गोष्ट बोलत आहे आणि तिला पुरवठाही केला जात आहे.

  • समन्स स्वीकारण्यास रकुलची टाळाटाळ

फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटासह सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर श्रुती मोदी, अभिनेत्री रकुल प्रीत सिंग यांना आज (24 सप्टेंबर) एनसीबीने चौकशीसाठी बोलावले आहे. सिमॉन खंबाटा सकाळीच एनसीबी कार्यालयात दाखल झाली, परंतु रकुल समन्स मिळाले नसल्याचे कारण पुढे करत चौकशीसाठी येण्यास टाळाटाळ केली आहे. रकुलच्या निकटवर्तीयांनी सांगितल्यानुसार, त्यांना मुंबई किंवा हैदराबाद येथील घरी कुठलेच समन्स मिळालेले नाही.

तर दुसरीकडे एनसीबीने मात्र तिचे दावे फेटाळून लावले आहेत. रकुल प्रीत सिंगला आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून समन्स देण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडिया, फोनद्वारे तिला कळवण्याचा प्रयत्न केला. तिच्या व्हॉट्सअॅपवरही समन्स पाठवण्यात आले आहे. मात्र, तिच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळालेला नसल्याचे एनसीबी अधिकारी केपीएस मल्होत्रा यांनी म्हटले आहे.

  • सारा आणि श्रद्धा यांनाही हजर व्हावे लागणार

एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात दोन एफआयआर नोंदवल्या आहेत, त्यापैकी एफआयआर क्रमांक 15/20 अंतर्गत अभिनेत्री दीपिका पदुकोणची चौकशी केली जाणार आहे. तर याच एफआयआर अंतर्गत एनसीबी रकुल प्रीत सिंगही चौकशी करेल. दुसर्‍या एफआयआरमध्ये सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची नावे समाविष्ट आहेत. सारा आणि श्रद्धा यांना 26 सप्टेंबर रोजी हजर राहायचे आहे.