आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शूटिंग अपडेट:पुढील आठवड्यात शाहरुख खान-जॉन अब्राहमसोबत पठाणच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार दीपिका पदुकोण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यापूर्वी दुबईत चित्रपटाचे एक शेड्युल पूर्ण झाले आहे.

अभिनेता शाहरुख खानच्या आगामी बहुचर्चित चित्रपट म्हणजे पठाण. या चित्रपटात त्याच्यासह जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण स्क्रीन स्पेस शेअर करणार आहेत. जॉनने शाहरुखसोबत चित्रपटातील काही दृश्यांचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. मात्र अद्याप दीपिका पदुकोण चित्रीकरणात सहभागी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, आता दीपिका पुढील आठवड्यात शाहरुख आणि जॉनसह चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे.

निर्माता आदित्य चोप्रा 'पठाण' या आगामी चित्रपटाचे पुढील वेळापत्रक यशराज स्टुडिओमध्ये शूट करणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, स्टुडिओतच यासाठी एक सेटही तयार केला आहे. सेटचे काम चालू असताना शाहरुख खान आणि जॉन अब्राहम यांच्यासह शेड्युलमधील काही सीन चित्रित करण्यात आले आहेत. पुढच्या आठवड्यात दीपिका त्यांच्यासोबत सामील होणार आहे. सिद्धार्थ आनंद हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

यापूर्वी दुबईत चित्रपटाचे एक शेड्युल पूर्ण झाले आहे. तेथून परतलेली टीम फिल्म सिटीमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाचे सेट तोडत तयार केलेल्या सेटवर चित्रीकरण करणार होते. मात्र नंतर निर्मात्यांनी कोविडच्या वाढत्या घटना लक्षात घेता ही योजना रद्द केली.

बातम्या आणखी आहेत...