आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादीपिका पदुकोण अलिकडेच भूतानमध्ये होती. आता ती भूतानहून मुंबईत परतली आहे. नुकतीच ती मुंबई विमानतळावर स्पॉट झाली, ज्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये, दीपिका उंच नेक टॉप आणि लाल पफर जॅकेटमध्ये दिसत आहे. यात तिने डेनिम जीन्स आणि ब्लॅक गॉगलही घातला आहे. एवढ्या गरमीत अभिनेत्रीला या आउटफिटमध्ये पाहून लोक आश्चर्य व्यक्त करत असून तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स ट्रोल करत आहेत
दीपिकाच्या या व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'ती स्वत:ला हॉलिवूड अभिनेत्री समजते'. दुसऱ्या युजरने लिहिले की, 'साऱ्या जगाची थंडी हिला वाजते'. तर तिसर्याने लिहिले, 'अरे बाबा, भारतातील कोणते ठिकाण इतके थंड आहे'.
याआधीही जॅकेट घालण्यावरून ट्रोल झाली आहे
याआधीही युजर्सनी दीपिकाला उन्हाळ्यात जॅकेट आणि रात्री चष्मा घालण्यावरून ट्रोल केले आहे. दीपिका मुंबई विमानतळावर स्पॉट झाली होती. यात तिने ऑलिव्ह ग्रीन को-ऑर्डर सेटवर हेवी आर्मी प्रिंट जॅकेट घातले होते. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले होते की, 'रात्री काळ्या चष्म्याची काय गरज आहे.' तर त्याच यूजरने लिहिले की, 'उन्हाळ्यात एवढे जाड जॅकेट कोण घालते'.
दीपिकाचे आगामी प्रोजेक्ट्स
अभिनेत्रीच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच हृतिक रोशनसोबत 'फायटर' चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अनिल कपूरही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय अभिनेत्री अलीकडेच शाहरुख खान आणि जॉन अब्राहमसोबत 'पठाण'मध्ये दिसली होती. तिच्याकडे 'द इंटर्न' आणि 'प्रोजेक्ट के'चा हिंदी रिमेकही आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.