आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जवान:शाहरुख खानच्या चित्रपटात झळकणार दीपिका पदुकोण, कॅमिओ भूमिकेत दिसणार अभिनेत्री

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'जवान'मध्ये दीपिकाची छोटी भूमिका आहे.

शाहरुख खानने काही दिवसांपूर्वीच त्याच्या आगामी 'जवान' चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटात शाहरुखसोबत नयनतारालाही कास्ट करण्यात आले आहे. आता बातमी आहे की, दीपिका पदुकोण देखील शाहरुखच्या चित्रपटात छोटी भूमिका साकारू शकते. 'पठाण' या चित्रपटातदेखील दीपिका शाहरुखसोबत दिसणार आहे.

'जवान'मध्ये दीपिकाची छोटी भूमिका
पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, "दीपिकाची गेल्या काही काळापासून शाहरुख आणि एटलीसोबत चर्चा सुरु आहे. अभिनेत्री या चित्रपटात छोट्या पण महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तिने चित्रपटात काम करण्यास होकार दिला आहे, पण कागदोपत्री अजून येणे बाकी आहे."

शाहरुख दीपिकाला भेटण्यासाठी हैदराबादला गेला होता
रिपोर्ट्समध्ये पुढे म्हटले आहे की, "शाहरुख खान अलीकडेच हैदराबादला गेला होता, जिथे त्याने एटलीसह दीपिकाची भेट घेतली. त्यांनी दीपिकाच्या व्यक्तिरेखेबद्दल आणि शूटिंगच्या तारखांबद्दलही चर्चा केली. दीपिका तिच्या आगामी फिल्म प्रोजेक्टच्या निमित्ताने हैदराबादमध्ये आहे."

'जवान' 2 जूनला प्रदर्शित होणार आहे
शाहरुख आणि नयनतारा व्यतिरिक्त या चित्रपटात राणा डग्गुबती, सान्या मल्होत्रा ​​आणि सुनील ग्रोव्हर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. रेड चिलीज एंटरटेन्मेंट निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन एटली करणार आहेत. काही काळापूर्वी शाहरुखने चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक रिलीज केला होता. पुढील वर्षी 2 जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

दीपिकाचे आगामी प्रोजेक्ट्स
याशिवाय दीपिका अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' या शेवटच्या चित्रपटातही छोट्या भूमिकेत दिसणार आहे. ही अभिनेत्री पुढे SRK आणि जॉन अब्राहम यांच्यासोबत 'पठाण' मध्ये दिसणार आहे, जो 25 जानेवारी 2023 रोजी रिलीज होणार आहे. यानंतर दीपिका हृतिक रोशनसोबत सिद्धार्थ, आनंदच्या 'फाइटर' चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 28 सप्टेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. दीपिकाकडे प्रभाससोबत 'प्रोजेक्ट के' आणि अमिताभ बच्चनसोबत 'द इंटर्न'चा रिमेक आहे.