आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅमिओ रोल:‘सर्कस’मध्ये स्पेशल साँग करणार दीपिका पदुकोण

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांनी बऱ्याच चित्रपटांत एकत्र काम केले आहे. आता पुन्हा एकदा दीपिका आपल्या पती रणवीरसोबत त्याच्या आगामी ‘सर्कस’ चित्रपटात एका विशेष गाण्यावर नृत्य करताना दिसणार आहे. सूत्रानुसार, दीपिकाने या विशेष गाण्याचे शूटिंगदेखील पूर्ण केले आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सर्कस’मध्ये रणवीरच्या व्यतिरिक्त जॅकलिन फर्नांडिस आणि पूजा हेगडेदेखील मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट ३१ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

खरं तर, रणवीर आणि दीपिका ‘८३’ मध्येही एकत्र दिसणार आहेत. हा क्रिकेटर कपिल देव यांचा बायोग्राफी आहे. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर क्रिकेटर कपिल देव आणि दीपिका त्यांची पत्नी रोमी भाटिया देवच्या भूमिकेत आहेत. दीपिका या चित्रपटाची सहनिर्मितीदेखील आहे. ‘८३’ ४ जूनला चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...