आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बर्थ डे बॅश:दीपिकाने थ्रोबॅक फोटो शेअर करत वडील प्रकाश पदुकोण यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, त्यांना म्हटले - 'ग्रेटेस्ट ऑफ-स्क्रीन हिरो' 

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रकाश पदुकोण यांनी वयाची 65 वर्षे पूर्ण केली आहेत.

अभिनेत्री दीपिका पदुकोणचे वडील आणि भारताचे माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांचा आज (10 जून) वाढदिवस आहे. यानिमित्ताने दीपिकाने सोशल मीडियावर एक प्रेमळ संदेश लिहून आपल्या वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने तिच्या वडिलांसोबतचा एक थ्रोबॅक फोटोही शेअर केला आहे, ज्यामध्ये ती वडिलांच्या मांडीवर बसलेली दिसत आहे.

दीपिकाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे, 'पडद्यामागील महान नायक, काश मी देखील त्यांच्यासारखी होऊ शकले असते. केवळ एका क्षेत्रातील यश संपादन करून खरा चॅम्पियन बनता येत नाही, परंतु ते एक चांगला माणूस होण्यासाठी आहे, ही शिकवण दिल्याबद्दल धन्यवाद. 65 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पापा. आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो #पापा #पदुकोण '

भारतीय खेळात तुमचे योगदान अतुलनीय आहे

यापूर्वी 2 फेब्रुवारी रोजी वडिलांच्या बॅडमिंटन अकादमीला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दीपिकाने एक पोस्ट शेअर करत लिहिले होते की, 'बॅडमिंटन आणि भारतीय खेळांमध्ये तुमचे योगदान अतुलनीय आहे. तुमच्या समर्पण, शिस्त, दृढनिश्चय आणि बर्‍याच वर्षांच्या कठोर मेहनतीबद्दल तुमचे धन्यवाद. आम्ही तुमच्यावर प्रेम करतो आणि तुमचा आम्हाला अभिमान आहे. तुम्ही जसे आहात, त्याबद्दल धन्यवाद. #प्रकाशपदुकोणबॅडमिंटनअकादमी #25वर्षे', असे दीपिका म्हणाली होती. 

कोण आहेत प्रकाश पदुकोण?

दीपिकाचे वडील भारतातील यशस्वी बॅडमिंटनपटूंपैकी एक आहेत. त्यांचा जन्म 10 जून 1955 रोजी झाला होता. 1972 साली वयाच्या 17 व्या वर्षी त्यांनी नॅशनल ज्युनियर बॅडमिंटन टाइटलसोबत सीनिअर टाइटल जिंकले होते. त्यानंतर 1980 मध्ये ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली होती. हा किताब जिंकणारे ते पहिले भारतीय होते. 

आगामी चित्रपट

दीपिकाच्या आगामी चित्रपटांविषयी सांगायचे म्हणजे तिचा '83' हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज झाला असून लॉकडाऊनमुळे त्याचे प्रदर्शन रखडले आहे. ती लवकरच शकुन बत्रांच्या अद्याप नाव न ठरलेल्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या चित्रपटात तिच्यासह अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदीदेखील दिसणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...