आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परी म्हणू की सुंदरा...:OSCAR मध्ये पोहोचलेल्या दीपिकावरुन हटणार नाही तुमची नजर! कानामागे काढलेल्या टॅटूने वेधले लक्ष

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉलिवूडमधील डॉल्बी थिएटरमध्ये आज 95 वा ऑस्कर सोहळा पार पडला. यंदा 'RRR' या भारतीय चित्रपटाने ऑस्करमध्ये इतिहास रचला. चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्याने अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत ऑस्कर जिंकून इतिहास रचला. 'नाटू नाटू'ला ऑस्कर मिळण्यापूर्वी या गाण्यावर दमदार परफॉर्मन्सही झाला. या परफॉर्मन्सला स्टँडिंग ओव्हेशन मिळाले. विशेष म्हणजे यंदा ऑस्करमध्ये प्रेझेंटर म्हणून अभिनेत्री दीपिका पदूकोणची निवड करण्यात आली होती. दीपिकाने ऑस्करच्या रेड कार्पेटवर हजेरी लावली आणि सगळ्यांचे भान हरपले. दीपिकानेच या गाण्याच्या लाइव्ह परफॉर्मन्सची घोषणा केली.

यावेळी दीपिका पदुकोण म्हणाली, "हे गाणे यूट्यूब आणि टिक टॉकवर लाखो वेळा पाहिले गेले आहे. ऑस्करसाठी नामांकन मिळालेले हे भारतीय इंडस्ट्रीतील पहिले गाणे आहे. तुम्हाला 'नाटू' म्हणजे काय माहित आहे का, नसेल तर आता कळेलच. सादर करत आहोत 'RRR'चे 'नाटू नाटू' गाणे..."

यावेळी स्टेजवर आलेल्या दीपिका पदुकोणवरुन बघणाऱ्यांची नजर हटली नाही. दीपिकाने तिच्या नुसत्या हसण्याने अनेकांना घायाळ केले आहे. तिने या सोहळ्यासाठी काळ्या रंगाला पसंती दिली. आता दीपिकाचा ऑस्करच्या स्टेजवरील व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिच्या लूकचे चाहते तोंडभरुन कौतुक करत आहेत.

चाहत्यांनी केले दीपिकाचे कौतुक
सोशल मीडियावर अनेकांनी याला 'अभिमानाचा क्षण' असे म्हटले आहे. तर एका यूजरने कमेंट करत 'ती किती सुंदर दिसत आहे' असे म्हटले आहे. एका यूजरने दीपिकाच्या आत्मविश्वासाचे कौतुक केले आहे.

ब्लॅक कलरच्या ऑफ शोल्डर गाऊनमध्ये दीपिका आत्मविश्वासाने वावरताना दिसली. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरदेखील या लूकमधील फोटो शेअर केले आहेत. ब्लॅक कलरच्या वेलव्हेट ड्रेसमध्ये दीपिका एखाद्या राजकन्येप्रमाणे दिसली. बन हेअरस्टाइल व मेकअप करत करत दीपिकाने ग्लॅमरस लूक केला. शिवाय गळ्यात एक हिऱ्यांचा नेकलेस, हातात हिऱ्यांचे ब्रेसलेट आणि अंगठी अशा लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसली.

दीपिकाने कानामागे काढला टॅटू

दीपिकाने शेअर केलेल्या एका फोटोत तिच्या कानामागे एक टॅटू दिसतोय. या टॅटूने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. दीपिकाने स्वत:च्या ब्रँडच्या नावाचा टॅटू केला आहे. यात 82.E असे लिहिले आहे. दीपिकाने काही महिन्यांपूर्वी एक ब्यूटी ब्रँड सुरु केला आहे. याचे नाव 82.E असे ठेवले आहे. त्याचाच टॅटू तिने तिच्या कानाच्या मागे काढला आहे. दीपिकाच्या या टॅटूने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे.

ऑस्करमध्ये भावूक झाली दीपिका
या सोहळ्यात 'नाटू नाटू' या गाण्याने ऑस्करवर मोहोर उमटवली. संगीतकार एम.एम. किरवानी आणि चंद्रबोस यांनी मंचावर जाऊन ऑस्कर पुरस्कार स्वीकारला. ‘नाटू नाटू’चा पुरस्कार स्वीकारताना किरवानी म्हणाले, ‘मी कारपेंटर्सची गाणी ऐकत मोठा झालो आणि आज माझ्या हातात ऑस्कर पुरस्कार आहे’. किरवानी यांचे स्टोजवर स्पीच सुरू असताना दीपिका पदुकोण भावूक झालेली दिसली.