आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेत्री दीपिका पदुकोणचे वडील आणि माजी राष्ट्रीय बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. ते सध्या बंगळुरूमधील रुग्णालयात दाखल आहेत. प्रकाश यांच्या व्यतिरिक्त त्यांच्या पत्नी उज्जला आणि मुलगी अनिषा यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या दोघीही सध्या घरातच क्वारंटाइन आहेत. वृत्तानुसार प्रकाश यांची प्रकृती ठीक असून या आठवड्याच्या अखेरीस त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
प्रकाश यांना आठवडाभर ताप होता
प्रकाश पदुकोण यांचे मित्र विमल कुमार यांनी सांगितल्यानुसार, प्रकाश आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांना दहा दिवसांपूर्वी कोरोना संसर्गाची लक्षणे दिसली. जेव्हा त्यांची चाचणी झाली तेव्हा त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. या सगळ्यांनी स्वतःला आयसोलेट केले होते. मात्र आठवड्याभरानंतरही प्रकाश यांचा ताप कमी होत नव्हता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता ते ठिक असून पुढील दोन ते तीन दिवसांत त्यांना रुग्णालयातून सुट्टी दिली जाणार आहे.
दीपिकाने सुरु केले मानसिक आरोग्यावर काम
दीपिका पदुकोणने कोरोना महामारीच्या काळात मानसिक आरोग्याच्या समस्येने ग्रस्त लोकांसाठी काही हेल्पलाईन नंबर शेअर केले आहेत. जेणेकरून या काळात लोक एकाकीपणाच्या भावनेला बळी पडणार नाहीत आणि सोबतच आत्महत्येसारखे विचार त्यांच्या मनात येणार नाहीत. याविषयी दीपिकाने लिहिले होते - आपल्यातील लाखो लोक, अगदी मी आणि माझे कुटुंबसुद्धा एकमेकांपासून दूर राहून संघर्ष करीत आहेत. आपण हे विसरू नये की, सद्य परिस्थितीत सर्वांनी स्वतःची इमोशनल काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. लक्षात ठेवा, आपण एकटे नाहीत. या संकटात आपण सर्वजण एकत्र आहोत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.