आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

करिश्मा प्रकाशने दिला नोकरीचा राजीनामा:ड्रग्ज प्रकरणात अडकल्यानंतर दीपिकाच्या मॅनेजरने KWANचा दिला राजीनामा, समन मिळाल्यापासून आहे फरार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्या महिन्यात एनसीबीने 2 वेळा करिश्माची चौकशी केली होती.

अभिनेत्री दीपिका पदुकोणची टॅलेंट मॅनेजर करिश्मा प्रकाश हिने ड्रग्ज प्रकरणात अडकल्यानंतर टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी क्वानचा राजीनामा दिला आहे. बॉम्बे टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, "करिश्मा आता एजन्सीमध्ये काम करत नाही. तिने 21 ऑक्टोबरला आपला राजीनामा पाठवला आहे. दीपिका पदुकोण आणि इतर कलाकारांसोबतचे तिचे संबंध क्वानची कर्मचारी म्हणून होते." विशेष म्हणजे करिश्माने स्वतःहून राजीनामा दिला असला तरी दीपिकानेच तिला कामावरुन काढल्याची चर्चा रंगली आहे.

  • एनसीबीचे समन्स मिळाल्यापासून करिश्मा फरार आहे

करिश्मा प्रकाश नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे समन मिळाल्यापासून फरार आहेत, अशी माहिती वृत्तसंस्था आयएएनएसने दिली आहे. एनसीबीच्या एका अधिका-याने सोमवारी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अधिका-याच्या म्हणण्यानुसार, करिश्माला 27 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. पण ती चौकशीसाठी हजर झाली नव्हती. आता तिला नवीन समन पाठविण्यात आले आहे. सध्या ती फरार आहे. त्यामुळे तिची आई मिताक्षरा पुरोहित यांना समन देण्यात आले.

  • करिश्माच्या घरातून ड्रग्ज जप्त

गेल्या मंगळवारी तिच्या घरातून 1.8 ग्रॅम बंदी असलेले ड्रग्ज जप्त करण्यात आले. यानंतर, करिश्माला बुधवारी एनसीबीने चौकशीसाठी बोलावले. दिवसभर एनसीबीच्या अधिका-यांनी तिची वाट पाहिली. पण ती हजर झाली नाही. चौकशीसाठी गैरहजर राहिल्यानंतर गुरुवारी तिच्याविरोधात नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर अटक टाळण्यासाठी करिश्मा प्रकाशने शनिवारी एनडीपीएस कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली आहे.

  • करिश्माला होऊ शकते अटक

करिश्माच्या घरातून जप्त करण्यात आलेले ड्रग्ज अत्यंत अल्प प्रमाणात असले तरी, यासाठी तिला अटक केली जाऊ शकते. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करिश्माच्या या घरातून सीबीडी तेलाच्या तीन बॉटलही जप्त केल्या आहेत. दोषी ठरल्यास तिला एक वर्षाची कठोर कारावासाची शिक्षा किंवा दहा हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्हीची शिक्षा होऊ शकते.

  • एनसीबीने करिश्मानी दोनदा चौकशी केली आहे

गेल्या महिन्यात एनसीबीने 2 वेळा करिश्माची चौकशी केली होती. एकदा करिश्माला दीपिका पदुकोणसमोर प्रश्नोत्तरे केली गेली. काही दिवसांपूर्वी दीपिका आणि करिश्मा यांच्यातील ड्रग्जबाबतचे संभाषण समोर आले होते. दीपिका आणि करिश्मा यांच्यातील हे संभाषण 28 ऑक्टोबर 2017 रोजी झाले होते. करिश्माशी झालेल्या संभाषणात दीपिकाने 'हॅश' आणि 'वीड' सारखे शब्द वापरले होते. बंदी असलेल्या हॅशला ड्रग्जच्या भाषेत चरस म्हटले जाते. या दोघींमधील संभाषणात 'हॅश' आणि 'वीड'चा वापर कुणासाठी केला गेला, हे स्पष्ट झाले नाही. यात ड्रग्जच्या प्रमाणाचाही उल्लेख नाही.

  • ड्रग्ज कनेक्शनमध्ये दीपिका-करिश्माचे नाव कसे आले?

करिश्मा प्रकाश सेलिब्रिटी मॅनेजमेंट कंपनी क्वानमध्ये काम करायची. ही कंपनी 40 बॉलिवूड सेलिब्रिटींना टॅलेंट मॅनेजर पुरवते. रिया चक्रवर्तीची मॅनेजर जया साहा ही देखील याच कंपनीत काम करते. जया करिष्माची सीनिअर आहे. एनसीबी, सीबीआय आणि ईडीच्या पथकाने अनेकदा जयाची चौकशी केली. तपासादरम्यान एनसीबीला जया आणि करिश्मा यांच्यातील चॅट्सची माहिती मिळाली. यानंतर हे प्रकरण दीपिकापर्यंत पोहोचले.