आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पठाण'चे नवीन मोशन पोस्टर रिलीज:दीपिकाचा लक्ष वेधून घेणारा लूक आला समोर, सहा महिन्यांनी थिएटरमध्ये दाखल होतेय फिल्म

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या चित्रपटात अभिनेता सलमान खानसुद्धा कॅमिओ रोलमध्ये दिसणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

बॉलिवूडचा किंग खान अर्थातच शाहरुख खानच्या आगामी 'पठाण' या चित्रपटाची त्याचे चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. या चित्रपटात शाहरुख खान हा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटाद्वारे शाहरुख खान हा तब्बल चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर शाहरुखने शेअर केला होता. त्यात त्याच्या लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. शाहरुखनंतर आता दीपिकाचा लूक निर्मात्यांनी रिव्हील केला आहे.

चित्रपटाचे नवीन मोशन पोस्टर रिलीज झाले असून यात दीपिकाचा रॉकिंग अंदाज दिसतोय. शिवाय तिच्या हातात पिस्तूलही दिसतंय. ती एका मिशनवर निघाली असल्याचा अंदाज या मोशन पोस्टरवरुन आपल्याला लावता येऊ शकतो.

दीपिकाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर चित्रपटातील तिचा लूक रिव्हील केला असून त्याच्या कॅप्शनमध्ये 'Tadaa' असे लिहिले आहे. आज म्हणजेच 25 जुलै रोजी तिचा हा लूक रिलीज करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आजपासून बरोबर सहा महिन्यांनी म्हणजेच 25 जानेवारी 2023 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

काही दिवसांपूर्वी शाहरुख खानने त्याच्या इंस्टाग्रामवर पठाण चित्रपटाचा टिझर शेअर केला होता. हा टिझर शेअर करताना शाहरुखने त्याला भन्नाट कॅप्शन दिले होते. “मला माहिती आहे फार… उशीर झाला आहे. पण तारीख लक्षात ठेवा. वेळ सुरु झाली आहे. येत्या 25 जानेवारी 2023 रोजी चित्रपटगृहात भेटू”, असे शाहरुख खानने म्हटले होते.

यश राज फिल्मला नुकतीच 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने यश राज फिल्म्स ‘पठाण’ हा चित्रपटाची निर्मिती करत आहे. या चित्रपटात शाहरुख खान हा प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. ‘पठाण’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमही दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने शाहरुख आणि जॉन ही जोडी पहिल्यांदा पडद्यावर पाहायला मिळणार आहे. शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलुगू या भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता सलमान खानसुद्धा कॅमिओ रोलमध्ये दिसणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

बातम्या आणखी आहेत...