आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दीपिकाच्या अडचणी वाढणार:कालपर्यंत गोव्यात सुरु होते दीपिका पदुकोणच्या चित्रपटाचे शूटिंग, ड्रग चॅटमध्ये नाव समोर येताच चित्रीकरण थांबवले

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्याच आठवड्यात दीपिकाने सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे यांच्यासह चित्रीकरणाला सुरुवात केली होती.

ड्रग्ज चॅटमध्ये नाव समोर आल्यानंतर अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. अलीकडेच ती करण जोहरच्या प्रॉडक्शनच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गोव्याला पोहोचली होती. अद्याप नाव न ठरलेल्या या चित्रपटाचे चित्रीकरण आता थांबवण्यात आले आहे. गेल्याच आठवड्यात दीपिकाने सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे यांच्यासह चित्रीकरणाला सुरुवात केली होती.

  • काल संध्याकाळपर्यंत शूटिंग सुरु होते

या चित्रपटाचे दिग्दर्शन शकुन बत्रा करत आहेत. काही दिवसांपूर्वी करण जोहरही आई आणि मुलांसमवेत गोव्यात गेला होता. ड्रग चॅट व्हायरल झाल्यापासून दीपिका गप्प बसली आहे. टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार काल रात्रीपर्यंत या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होते. सेटवर हजर असलेल्या लोकांनी सांगितले की बुधवारी सकाळी निर्मात्यांनी पॅकअप केले. लोकेशनच्या जवळच्या प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार काल संध्याकाळी सात वाजेपर्यंत येथे चित्रीकरण सुरु होते, मात्र आज सकाळी सेटवर कुणीही दिसले नाही.

  • सिद्धांतने व्हिडिओ शेअर केला होता

हा सेट 15 दिवसांपूर्वी तयार करण्यात आला होता. दीपिका येथे जवळपास 4-5 वेळा दिसली होती. एका दिवसापूर्वी सिद्धांतने लोकेशनचा व्हिडिओ शेअर केला होता. एनसीबीने रियाची टॅलेंट मॅनेजर जया साहाचे व्हॉट्सअॅप चॅटव एनसीबीने शोधल्यानंतर दीपिकाचे ड्रग्ज प्रकरणात नाव समोर आले. या चॅटमध्ये दीपिका करिश्मा प्रकाशला मालसंदर्भात विचारणा करत आहे. इतकेच नाही तर तिने करिश्माला हशीशबद्दलही विचारणा केली.

  • दीपिकाला 3 दिवसांत हजर राहावे लागणार

दरम्यान, एनसीबीच्या चौकशीत दीपिकाची मॅनेजर करिश्माला दिलासा मिळाला आहे. ती सध्या आजारी आहे. तर दीपिका, सारा अली खान, रकुल प्रीत सिंग, श्रद्धा कपूर यांच्यासह 7 जणांना एनसीबीने समन्स बजावले आहे. या सर्वांना तीन दिवसांत एनसीबीसमोर हजर व्हावे लागेल. याशिवाय बुधवारी तिसर्‍या दिवशी एनसीबीने जयाची विचारपूस केली. जया व्यतिरिक्त मधु मांटेना, एबिगेल पांडे, सनम जोहर यांनाही चौकशीसाठी बोलावले होते.

बातम्या आणखी आहेत...