आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडिया:इंटरनेटवर व्हायरल होत आहे दीपिका-रणवीर आणि विराट-अनुष्काचे क्युट कार्टुन, स्वत: शेअर करताहेत कलाकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हे कार्टुन इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

लॉकडाऊनच्या या काळात बॉलिवूडचे सेलेब्स सोशल मीडियावर खूप वेळ घालवत आहेत. यादरम्यान आर्टिस्ट अर्पिता दुडेवालने सोशल मीडियावर काही कलाकारांचे कार्टून अपलोड केले. ते कलाकारांनी स्वत: शेअर केले आहे.

  • दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग

मिकी आणि मिनी माऊसवर आधारित या कार्टूनमध्ये रणवीर सिंह आणि त्याची पत्नी दीपिका पादुकोण दिसत आहे. याला शेअर करताना रणवीरने लिहिले, “हृदयापर्यंत पोहोचायचा रस्ता पोटातून जातो.’

  • विराट कोहली आणि अनुष्का शर्मा

शॅगी आणि वेल्मा झालेले विराट कोहली आणि अनुष्का शर्मा प्रसिद्ध कॅरेक्टर स्कूबी डूसोबत दिसत आहे. हा फोटो अनुष्काने शेयर केला.

  • आयुष्मान खुराणा

वॉल्ट डिज्नीच्या अलादीनवर बनलेल्या या कार्टूनला आयुष्मान खुराणाचा चेहरा लावला आहे. हे आयुष्मान आणि त्याची पत्नी ताहिरा दोघांनाही आवडले आहे.

बातम्या आणखी आहेत...