आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

69 वर्षांची झाली चमको गर्ल:फारुख शेखसोबत ऑन स्क्रिन हिट ठरली होती दीप्ती नवलची जोडी, प्रकाश झांसोबत झाला घटस्फोट

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2005 मध्ये दीप्ती आणि प्रकाश झा यांचा घटस्फोट झाला होता.

अभिनेत्री दीप्ती नवल यांची गणना बॉलिवूडच्या उत्कृष्ट अभिनेत्रींमध्ये होते. परदेशातून शिक्षण पूर्ण करुन भारतात परतलेल्या दीप्ती यांनी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाच्या बळावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचा जन्म 3 फेब्रुवारी 1957 रोजी अमृतसर येथे झाला. त्यांनी वयाची 69 वर्षे पूर्ण केली आहेत. दीप्ती नवल उत्कृष्ट अभिनेत्री तर आहेच, परंतु त्या कुशल कवीयत्री, चित्रकार आणि छायाचित्रकारसुध्दा आहेत. याव्यतिरिक्त त्यांना संगीताचीसुध्दा आवड आहे आणि त्या स्वत: काही वाद्य वाजवतात, हे विशेष. त्यांच्या प्रकाशित पुस्तकांमध्ये 'लम्हा-लम्हा' हे पुस्तक प्रसिध्द आहे.

1977 मध्ये सुरु केले करिअर
न्यूयॉर्कमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर दीप्ती यांनी 1977 मध्ये जलियांवाला बाग या चित्रपटाद्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यात त्यांनी सहायक अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. लीड अॅक्ट्रेस म्हणून त्यांचा पहिला चित्रपट 1980 मध्ये आलेला एक बार फिर हा होता. दीप्ती आर्ट आणि हलक्या फुलक्या चित्रपटांचा भाग राहिल्या. त्यांची गणना शबाना आझमी, स्मिता पाटील या अभिनेत्रींच्या कॅटेगरीत होते. अलीकडेच त्या पंकज त्रिपाठींच्या क्रिमिनल जस्टिस : बिहाइंड क्लोज्ड डोर्स या वेब सीरिजमध्ये झळकल्या. ही वेब सीरिज क्रिमिनल जस्टिसचा दुसरा भाग आहे.

आतापर्यंतच्या करिअरमध्ये 50 हून अधिक चित्रपट करणा-या दीप्ती नवल यांनी 'एक बार फिर', 'हम पांच', 'चश्मे बहाद्दूर', 'अंगूर', 'मिर्च मसाला' आणि 'लीला'सारख्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. तसे पाहता, दीप्ती नवल त्यांच्या 'चश्मे बहाद्दूर' या चित्रपटातून जास्त प्रसिध्द झाल्या होत्या. या सिनेमातील त्यांचा 'चमको वाशिंग पाउडर'च्या 'सेल्सगर्ल'चा अभिनय आजही लोकांच्या आठवणीत आहे.

दीप्ती नवल आणि फारुख शेख यांची जोडी 80 च्या दशकातील सर्वाधिक हिट जोडी होती. या जोडीने अनेक हिट चित्रपट दिले. चश्मे बद्दूर (1981), साथ-साथ (1982), किसी से न कहना (1983), कथा (1983), रंग-बिरंगी (1983) या चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केले. या जोडीचा शेवटचा चित्रपट 'लिसेन अमाया' 2013 मध्ये रिलीज झाला होता.

प्रकाश झांसोबत झाला घटस्फोट

दीप्ती यांनी 1985 मध्ये दिग्दर्शक प्रकाश झा यांच्यासोबत लग्न केले होते. दोघांनी दिशा या मुलीला दत्तक घेतले होते. दिशा सिंगिंगमध्ये करिअर करत आहे. तिने वडिलांच्या राजनिती या चित्रपटासाठी कॉश्च्युम डिझायनर म्हणूनही काम केले होते. 2005 मध्ये दीप्ती आणि प्रकाश झा यांचा घटस्फोट झाला होता. मात्र त्यांचे नाते यापूर्वीच संपुष्टात आले होते. घटस्फोटानंतरही हे दोघे एकमेकांचे चांगले मित्र आहेत.

बातम्या आणखी आहेत...