आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
48 व्या एमी अवॉर्ड सोहळ्यात ‘दिल्ली क्राईम’ या वेब सीरिजने आपली मोहोर उमटवली आहे. या वेब सीरिजने सर्वोत्कृष्ट ड्रामा या विभागात पुरस्कार पटकावला आहे. या विभागात ‘बेटर कॉल सोल’, ‘द किलिंग ईव्ह’, ‘द क्राऊन’, ‘स्ट्रेंजर थिंग्ज’ यांसारख्या अनेक सुपरहिट वेब सीरिजमध्ये स्पर्धा होती. परंतु या स्पर्धेत ‘दिल्ली क्राईम’ने बाजी मारत हा किताब आपल्या नावी केला आहे. 2012 मध्ये दिल्लीत घडलेल्या गँग रेपवर ही सीरिज आधारित आहे. रिची मेहता दिग्दर्शित या सीरिजमध्ये शेफाली शाहने पोलिस अधिका-याची भूमिका वठवली होती.
भारताकडून तीन कॅटेगरीत नॉमिनेशन होते
यावर्षी इंटरनॅशनल एमी अवॉर्ड्समध्ये भारताकडून तीन कॅटेगरीत नॉमिनेशन होते. दिल्ली क्राइमव्यतिरिक्त अॅमेझॉन प्राइम व्हिडिओची वेब सीरिज 'मेड इन हेवन'मध्ये मुख्य भूमिका साकारणारा अर्जुन माथूरला एमी अवॉर्ड्समध्ये बेस्ट अॅक्टर कॅटेगरीत नॉमिनेशन मिळाले होते. मात्र हा अवॉर्ड यूकेची टीव्ही सीरिज 'रिस्पांसिबल चाइल्ड'चा अभिनेता बिली बॅरेटला मिळाला.
याशिवाय कॉमेडी सीरिज कॅटेगरीत भारताकडून फोम मोर शॉट्स प्लीजला नॉमिनेशन मिळाले होते. मात्र हा अवॉर्ड नो-बॉडी लुकिंग (निन्गुएम ता ओल्हान्दो) या ब्राझिलियन कॉमेडी सीरीजने जिंकला.
कॅटेगरी | विजेता | देश |
बेस्ट अॅक्ट्रेस | ग्लेन्डा जॅक्सन (एलिजाबेथ इज मिसिंग) | यूके |
बेस्ट शॉर्ट-फॉर्म सीरिज | #मार्टीइजडेड | चेक रिपब्लिक |
बेस्ट नॉन इंग्लिश लँग्वेज यूएस प्राइमटाइम प्रोग्राम | 20th एनुअल लॅटिन ग्रॅमी अवॉर्ड्स आणि रिएना डेल सुर सीजन 2 | यूएस |
बेस्ट टेलीनोवेला | ओर्फोअस दा टेरा (ओर्फंस ऑफ अ नेशन) | ब्राझिल |
बेस्ट डॉक्युमेंट्री | फॉर सामा | यूके |
बेस्ट आर्ट्स प्रोग्रामिंग | Vertige De La Chute (Ressaca) | फ्रान्स |
बेस्ट नॉन स्क्रिप्टेड एंटरटेन्मेंट | ओल्ड पीपल होम फॉर 4 इयर ओल्ड्स | ऑस्ट्रेलिया |
पहिल्यांदा व्हर्च्युअली घोषित झाले अवॉर्ड्स
एमी हा ऑस्करप्रमाणेच टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील नामांकित पुरस्कार म्हणून ओळखला जातो. त्यामुळे हा पुरस्कार पटकवणे अनेक कलाकारांचं स्वप्न असते. या पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या कलाकारांचे जगभरातून कौतूक केले जाते. या पार्श्वभूमीवर एका भारतील वेब सीरिजने एमी अवॉर्ड पटकावणे नक्कीच कौतुकास्पद आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच या अवॉर्डची घोषणा व्हर्च्युअली करण्यात आली. 23 नोव्हेंबर रोजी न्यूयॉर्क सिटीच्या हॅमरस्टीन बॉलरुममधून लाइव्ह झालेल्या या अवॉर्ड सोहळ्याचे रिचर्ड काइंड यांनी सूत्रसंचालन केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.