आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OTT रिव्ह्यू:मॅडम सर वर्तिका चतुर्वेदी परतल्या, शेफाली शाहच्या दमदार अभिनय आणि पटकथेवर टिकली आहे सिरिज

शशांक मणी पांडे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कथा- दिल्लीत सकाळची थंडी आहे, प्रत्येकजण आपापल्या कामाला जात आहे. मॅडम सर म्हणजेच डीसीपी वर्तिका चतुर्वेदी आपल्या मुलीशी बोलतात, तेव्हाच नारायण येतो आणि सांगतो की खून झाला आहे. वर्तिका त्यांच्या सर्व सक्षम अधिकाऱ्यांना बोलावतात... येथूनच कथेची सुरुवात होते आणि केस सुरू होते. यावेळी गुन्हेगार खूप हुशार आणि सायको देखील आहेत. वर्तिका यांच्या अडचणी खूप वाढतात. त्यांच्यावर जनतेचा दबाव आहे, पण त्याहूनही वरच्या अधिकाऱ्यांचा दबाव आहे.

एकीकडे त्यांच्यावर दोन निष्पाप लोकांना मीडियासमोर आणण्याचा दबाव आहे, त्या त्याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. यावेळी गुन्हेगार सामान्य नसल्यामुळे वर्तिका या निर्दयी आणि दुष्ट किलरला कसे पकडतात हे बघणे मनोरंजक आहे. कुठल्यातरी वेषात तो गुन्हा करत आहेत. दुसरीकडे एसीपी नीती सिंग वैयक्तिक आयुष्यामुळे त्रस्त आहेत. देवेंदरशी लग्न केल्यानंतर तिला वेळ काढणे आणि कुटुंब सांभाळणे कठीण जात आहे.

अभिनय- शेफाली शाहने वर्तिकाच्या भूमिकेला न्याय दिला आहे. डीसीपीची भूमिकेत ती जणू खरोखरच आयपीएस आहे, असे वाटते. या मालिकेतील सर्वात महत्त्वाची भूमिका भूपिंदर म्हणजेच राजेश तैलंगची आहे, त्यानेही आपली भूमिका चोख बजावली आहे. दिल्ली क्राईमची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्याचे साइड कॅरेक्टर, मग तो जयराज, सुधीर किंवा आशुतोष असो. प्रत्येकाने आपल्या भूमिकेला न्याय दिला आहेय तिलोत्मा शोमने तिची भूमिका अत्यंत गांभीर्याने साकारली आहे. यामध्ये ती एका वेगळ्या अंदाजात दिसत आहे.

लेखन आणि दिग्दर्शन - दिल्ली क्राइमचा सीझन 2 मयंक तिवारी, शुभ्रा स्वरूप आणि विदित त्रिपाठी यांनी 6 लोकांच्या सहकार्याने लिहिला आहे. सिरिजमध्ये दाखवलेल्या गंभीर गुन्ह्याबद्दल लेखकाने खूप खोलवर लिहिले आहे. लेखन टीमची खास गोष्ट म्हणजे प्रत्येक एपिसोडमध्ये इतके नवीन चढ-उतार आहेत की तुम्ही एकामागून एक एपिसोड पाहत राहाल. तनुज चोप्राचे दिग्दर्शनही अप्रतिम आहे.

निष्कर्ष - या वीकेंडला तुम्ही 5 भागांची मालिका पाहू शकता. मालिकेचे लेखन आणि दिग्दर्शन तुम्हाला बिंज वॉज करण्यास भाग पाडते. दिव्य मराठी या सिरिजला 5 पैकी 3 स्टार देत आहे.

बातम्या आणखी आहेत...