आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

SRK चा मदतीचा हात:शाहरुखने दान केले 500 रेमडेसीवीर इंजेक्शन्स, दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन म्हणाले - 'मदतीबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत'

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • यापूर्वी शाहरुखने क्वारंटाइन सेंटरसाठी आपले ऑफिस दिले होते.

कोरोना काळात बॉलिवूडमधील अनेक कलाकार मदतीसाठी पुढे आले आहेत. बॉलिवूडचा किंग खान शाहरुखदेखील यात मागे नाही. त्याने क्वारंटाइन सेंटरसाठी आपले ऑफिस दिले होते. याशिवाय गरजूंना त्याने आर्थिक मदतदेखील केली. आता शाहरुखने दिल्लीतील कोरोना रुग्णांसाठी 500 रेमडेसीवीर इंजेक्शन्स दान केले आहेत.

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी मानले शाहरूखचे आभार
शाहरूखने दिल्लीला 500 रेमडेसीवीर इन्जेक्शन डोनेट केले. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले, “शाहरुख खान आणि मीर फाउंडेशनचे आम्ही मनापासून आभार मानतो. दिल्लीला सर्वात जास्त गरज असताना त्यांनी या कठीण काळात 500 रेमडेसीवीर इंजेक्शन्स दान केले. या गरजेच्या वेळी केलेल्या मदतीबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत”, असे ते म्हणाले आहेत. ही माहिती समोर आल्यानंतर शाहरुखच्या चाहत्यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

शाहरुखच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास, त्याने आपल्या बहुप्रतिक्षित पठान या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. यात त्याच्यासोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम झळकणार आहेत. याशिवाय तो राजकुमार हिरानींच्या 'इमिग्रेशन टेल' आणि दाक्षिणात्य दिग्दर्शक एटली यांच्या 'फ्लिक' या अॅक्शन पटात काम करणार आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser