आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • OTT Release Of 'Lal Singh Chaddha': The Film's Digital Release Will Be Done On A Gap Of Three Or Six Months, The Rights Of The Film Sold For 100 120 Crores

दिल्ली उच्च न्यायालयाकडून 'शमशेरा'च्या ओटीटी रिलीजला परवानगी:चित्रपट निर्मात्यांना रिलीजपूर्वी जमा करावे लागतील 1 कोटी रुपये

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता रणबीर कपूरचा 'शमशेरा' हा चित्रपट कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाला परवानगी दिली आहे, परंतु त्या बदल्यात यशराज फिल्म्सला रजिस्ट्रीकडे एक कोटी रुपये जमा करावे लागतील. चित्रपट निर्मात्यांवर कॉपीराइट उल्लंघनाचा आरोप करणाऱ्या बिक्रमजीत सिंग भुल्लरच्या खटल्यावर न्यायमूर्ती ज्योती सिंह यांनी हा आदेश दिला आहे.

कॉपीराइट प्रकरणात अडकला चित्रपट
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बिक्रमजीत सिंग भुल्लर नावाच्या व्यक्तीने कॉपीराइट कायद्यांतर्गत चित्रपट निर्मात्यांवर आरोप केला आहे की, शमशेरा हा चित्रपट त्यांच्या 'कबू ना छेडे खेत' या साहित्यकृतीची कॉपी आहे. या प्रकरणावर सुनावणी घेतल्यानंतर न्यायमूर्ती ज्योती सिंह यांनी निर्मात्यांना दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे.

ओटीटी रिलीजपूर्वी जमा करावा लागेल दंड
न्यायमूर्ती ज्योती सिंह यांनी निर्णय सुनावताना सांगितले की, हा चित्रपट गेल्या महिन्यात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता आणि 19 ऑगस्ट रोजी ओटीटीवर प्रदर्शित झाला. अशा परिस्थितीत पक्षांमधील समतोल राखण्यासाठी चित्रपट प्रदर्शित करणे योग्य ठरेल. पण जर निर्मात्यांनी 22 ऑगस्टपर्यंत दंड जमा केला नाही तर 23 ऑगस्टला चित्रपट OTT वरून काढून टाकला जाईल.

पडद्यावर चालली नाही 'शमशेरा'ची जादू
'शमशेरा' 22 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता, परंतु पडद्यावर हा चित्रपट फ्लॉप ठरला. अशा परिस्थितीत निर्मात्यांना ओटीटी रिलीजची अपेक्षा होती. परंतु ओटीटी स्ट्रीमिंगपूर्वीच हा चित्रपट कॉपीराइट प्रकरणात अडकला. 'शमशेरा'मध्ये रणबीर कपूर व्यतिरिक्त संजय दत्त आणि वाणी कपूर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...