आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतक-यांना आंतरराष्ट्रीय पाठिंबा:दिल्लीत FIR दाखल झाल्यानंतरही पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग शेतक-यांच्या पाठिशी उभी, म्हणाली - कोणतीही भीती हा निर्णय बदलू शकत नाही

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ग्रेटा थनबर्ग ही मूळची स्वीडनची रहिवासी असून 'नोबल पुरस्कार' विजेती आहे.

नव्या कृषी कायद्याविरोधात भारताच्या राजधानीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. याच आंदोलनाला सोशल मीडियावर पाठिंबा जाहीर करणारी 18 वर्षीय पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिच्याविरुद्ध भावना भडकावणारे ट्विट केल्याचा आरोप करत दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ग्रेटा थनबर्ग हिच्याविरोधात 153 ए, 120 बी सहीत आणखीही काही कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

असे असूनही सलग दुस-या दिवशी तिने शेतक-यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर म्हटले लिहिले की, मी आताही शेतक-यांसोबत उभी आहे. कोणतीही भीती माझा हा निर्णय बदलू शकत नाही. यापूर्वी मंगळवारी एक ट्विट करत, 'भारतातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आम्ही समर्थन देत आहोत', असे ग्रेटा थनबर्ग हिने म्हटले होते. तसंच आणखी एक ट्विट करत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एक ऑनलाईन मोहीम ग्रेटाने सुरू केली आहे.

ट्विटरने कंगना रनोटचे अनेक वादग्रस्त ट्विट केले डिलीट

कंगनाने शेतकरी आंदोलनाचे समर्थन करणा-या क्रिकेटपटूंना “हे सर्व क्रिकेटपटू धोबी का कुत्ता ना घर का ना घाट...'' असे म्हटले होते. मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने अभिनेत्री कंगना रनोटचे काही आक्षेपार्ह ट्विट डिलीट केले आहेत. कंगनाने केलेले हे ट्विट ट्विटरच्या नियमांचे उल्लंघन करणारे असल्याचे सांगण्यात येत आहे. मागील चार तासांत कंगनाच्या अकाउंटवरुन तीन ट्विट डिलीट करण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहानाने शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पोस्ट केल्यानंतर कंगनाने तिला खडे बोल सुनावले होते. कंगनाच्या या पोस्टनंतर ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. रिपोर्ट्सनुसार ट्विटर कंगनाच्या हँडलवर लक्ष ठेवून आहे. जर ती त्याच प्रकारे वादग्रस्त ट्विट करत राहिली तर तिचे अकाउंटही बंद केले जाऊ शकते.

रोहित शर्मावर केलेल ट्विट हटवले
कंगनाने शेतकरी आंदोलनाचे समर्थन करणा-या क्रिकेटपटूंना “हे सर्व क्रिकेटपटू धोबी का कुत्ता ना घर का ना घाट...'' असे म्हटले होते. ट्विटरने तिचे ते ट्विटदेखील डिलीट केले आहे. रोहित शर्माने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते, "जेव्हा आपण एकजुटीने उभे असतो तेव्हा देश कायमच मजबूत राहिला आहे. कठीण प्रसंगात समस्येचा तोडगा काढणे ही पहिली गरज आहे. भारताच्या विकासात शेतकऱ्यांची नेहमीच महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. मला खात्री आहे की, आपण एकजुटीने नक्कीच या प्रश्नावर तोडगा काढू", असे ट्विट रोहित शर्माने केले होते.

रोहित शर्माच्या या ट्विटवर रिप्लाय देताना कंगना चांगलीच संतापली आणि तिने जवळपास सर्वच क्रिकेटपटूंना धारेवर धरले होते. “हे सर्व क्रिकेटपटू धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशा स्वरुपात का बोलत आहेत? शेतकरी त्यांच्याच भल्यासाठी करण्यात आलेल्या कृषी कायद्यांना विरोध का करतील? हे दहशतवादी आहेत, आणि गोंधळ घालत आहेत. असं म्हणा ना की, ते दहशतवादी आहेत, भीती वाटते का?'' असे उत्तर कंगनाने रोहितच्या ट्विटवर दिले होते.

तर हे ट्विट हटविण्याचे कारण आहे का?

शिरोमणी अकाली दलाचे माजी नेते मनजितसिंग जीके यांनी ट्विटरला कंगना रनोटचे ट्विटर अकाऊंट त्वरित बंद करण्याची मागणी करणारी कायदेशीर नोटीस पाठविली आहे. त्यांनी नोटीसमध्ये लिहिले आहे की, कंगनाच्या पोस्ट फॅक्चुअली चुकीच्या आहेत. तिच्या पोस्ट केवळ शेतकर्‍यांचेच नव्हे तर त्यांच्याशी संबंधित संपूर्ण शीख समुदायाची प्रतिमा मलीन करणा-या आहेत.

वकील नगिंदर बेनीवाल यांच्यामार्फत पाठवण्यात आलेल्या या नोटीसमध्ये पॉप गायिका रिहाना यांच्या पोस्टवर कंगनाने केलेल्या वादग्रस्त कमेंटचा हवाला दिला आहे. ते म्हणतात की, कंगना आपल्या लोकप्रियतेचा वापर शेतकरी आणि शीख समुदायाचा अपमान करण्यासाठी करत आहे. त्यांना दहशतवादी म्हणत त्यांना देशविरोधी घोषित केले आहे.

बेनीवाल यांनी नोटीसमध्ये पुढे म्हटले आहे की, त्यांच्या क्लायंटला देश, शेतकरी आणि शीख समुदायाच्या ऐक्याबद्दल चिंता आहे. ते त्यांच्या सुरक्षिततेबद्दलही गंभीर आहेत. ते शेतकर्‍यांविरूद्ध करण्यात आलेली अशी बदनामीकारक चुकीची व द्वेषयुक्त विधान कधीही स्वीकारणार नाहीत.

नोटीसमध्ये ट्विटरला धमकी देण्यात आली आहे की, जर कंगनाचे वादग्रस्त ट्विट हटवले गेले नाही आणि तिचे अकाउंट सस्पेंड केले नाही तर त्यांनाही मानहानीसाठी जबाबदार धरले जाईल आणि त्यांच्याविरूद्ध योग्य कायदेशीर कारवाई केली जाईल.

काय होती रिहानाची पोस्ट आणि त्यावर कंगनाची कमेंट?
रियानाने 2 फेब्रुवारी रोजी भारतातल्या शेतकरी आंदोलनासंबंधी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपला पाठिंबा दर्शवला. एका बातमीची लिंक शेअर करत तिने लिहिले की, "आपण या विषयावर का बोलत नाही?" या पोस्टसह तिने #FarmersProtest हा हॅशटॅगही वापरला आहे. मात्र, कंगना रनोट हिने रिहानाच्या पोस्टवर टीका करत तिची गणना मुर्खांमध्ये केली आहे. कंगनाने लिहिले, "कुणीच याविषयी बोलत नाही कारण ते शेतकरी नव्हे अतिरेकी आहेत. ते भारताला कमजोर करण्याचा प्रयत्न करत आहेत. जेणेकरून चीनसारखे देश आपल्या देशावर ताबा मिळवतील आणि अमेरिकेसारखी चिनी वसाहत बनवतील. तू शांत रहा, आम्ही तुझ्यासारखे मुर्ख नाही, जो आमचा देश विकू”, असे सणसणीत प्रत्युत्तर कंगनाने रिहानाला दिले.

बातम्या आणखी आहेत...