आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविकी कौशल आणि कतरिना कैफ यांचे लग्न झाले आहे. हे या वर्षातील सर्वात मोठे लग्न होते, ज्याची बरीच चर्चा राहिली. या लग्नात सर्वात महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे प्रायव्हसी. म्हणजेच लग्नात काय-काय घडले याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले नाहीत. लग्नातील या खास गोष्टीचा आता सोशल मीडियावर उल्लेख केला जात आहे. दिल्ली आणि यूपी पोलिसांनी लोकांना अशाच प्रकारे सुरक्षा राखण्याचा संदेश दिला आहे.
VicKat लग्नाप्रमाणे पासवर्ड सुरक्षित ठेवा
दिल्ली पोलिसांनी विकी-कतरिनाच्या लग्नाचा हवाला देत लोकांना पासवर्ड सुरक्षित ठेवण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, लोकांनी त्यांचा पासवर्ड #VicKat च्या लग्नासारखा सुरक्षित ठेवावा. मात्र, दिल्ली पोलिसांनी सुरक्षेसाठी असे उदाहरण देण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी लोकांना अशी अनेक उदाहरणे देऊन सावध केले आहे.
विकी-कतरिनासारखी ऑनलाइन सुरक्षा बाळगा
दुसरीकडे, यूपी पोलिसांनी लोकांना लग्नासाठी सायबर सेफ्टीबाबत सूचना देताना विकी-कतरिनाच्या लग्नाचा हवाला दिला आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, सायबर गुन्हेगारांपासून दूर राहण्यासाठी विकी-कतरिनाप्रमाणे ऑनलाइन सुरक्षिततेच्या कक्षेत रहा. दिल्ली आणि यूपी पोलिसांचे हे ट्विट सध्या व्हायरल होत आहेत. पोलिसांनी केलेला हा विनोद असल्याचे अनेकांचे मत आहे.
सिक्स सेन्स फोर्ट बरवाडा येथे लग्न
कतरिना कैफ आणि विकी कौशल गुरुवारी सवाई माधोपूरमधील सिक्स सेन्स फोर्ट बरवाडा येथे विवाहबंधनात अडकले. सायंकाळी पाच वाजता दोघांनी सप्तपदी घेतल्या. दोघांचे चाहते त्यांच्या लग्नाच्या फोटोची आतुरतेने वाट पाहत होते. रात्री 8.30 च्या सुमारास विकी कौशलने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून लग्नाचे फोटो शेअर केले. या फोटोंसोबत विकीने एक नोटही लिहिली आहे. तो म्हणाला, 'आमच्या हृदयातील एकमेकांबद्दलचे प्रेम आणि आदर आज आम्हाला इथवर घेऊन आले आहे. आमच्या नवीन आयुष्यासाठी आम्हाला तुमच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे.'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.