आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूड:चित्रपटात कमी पात्रे-खोलीत चित्रीकरण, विनोदी-भयपटांची मागणी आता वाढली, गर्दीच्या दृश्यासाठी कलाकार राजी नाहीत

मुंबई / मनीषा भल्ला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनामुळे चित्रीकरणाच्या पद्धतीसोबतच कथाही रूप बदलत आहेत...

कोरोनाचा प्रभाव चित्रपटांच्या कथांवरही दिसू लागला आहे. सध्या हॉलीवूडमध्ये ज्या कथांवर काम सुरू आहे, त्यात विनोदी व भयपट जास्त आहेत. चित्रीकरण कमी गर्दीत तसेच एक-दोन खोल्यांतच होईल अशा कथा लेखक लिहीत आहेत. कंटेंट मार्केटिंगची प्रमुख कंपनी तुलसियाचे एमडी आणि चित्रपट निर्माते चैतन्य हेगडे सांगतात, एका खोलीत, इमारतीत किंवा खेड्यात चित्रीकरण होईल अशा कथांना त्यांचे प्राधान्य आहे. अशा कथा क्राइम थ्रिलर असतात. सायकोपॅथ पात्र असलेल्या कथांवरही काम सुरू आहे. तुलसियात २०० पेक्षा जास्त लेखक आहेत. हेगडे यांचे म्हणणे आहे की, प्रॉडक्शन हाऊसना असे वाटते की, चित्रपटगृह सुरू झाल्यानंतर लोकांना मसाला चित्रपट आवडतील. गंभीर व भावनिक मुद्द्यांना सुरुवातीला कमी मागणी असेल. सध्या चित्रपट लेखनात विनोदी, मसाला, भयपटांना प्राधान्य आहे. बर्फी, हीरोपंती आणि सुपर- ३० सारख्या चित्रपटांचे लेखक संजीव दत्ता सांगतात, ते सध्या मध्यमवर्गीय कुटुंबाची कहाणी असलेले चित्रपट लिहिताहेत. ते एखाद्या लहानशा गल्लीत चित्रित होतील आणि त्यात नवे चेहरे दिसतील. चित्रपट आर्टिकल-१५ चे लेखक गौरव सोलंकी कोविडच्या कथेवर काम करत आहेत.

सुपर- ३० सारख्या चित्रपटांचे लेखक संजीव दत्ता सांगतात, ते सध्या मध्यमवर्गीय कुटुंबाची कहाणी असलेले चित्रपट लिहिताहेत. ते एखाद्या लहानशा गल्लीत चित्रित होतील आणि त्यात नवे चेहरे दिसतील. चित्रपट आर्टिकल-१५ चे लेखक गौरव सोलंकी कोविडच्या कथेवर काम करत आहेत.

गर्दीच्या दृश्यासाठी कलाकार राजी नाहीत
कोरोनाचा चित्रपट कथांवर प्रभाव स्पष्टपणे दिसत आहे. आता जे चित्रपट तयार होतील त्यांच्या पटकथेत गर्दी, भाषण आणि स्टंटची दृश्ये असणार नाहीत किंवा एकदम कमी असतील. सध्या नाट्य व विनोदी कथा चालतील. कलावंतही गर्दीच्या दृश्यासाठी तयार नाहीत. - तिग्मांशू धुलिया, लेखक व दिग्दर्शक