आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियांका चोप्राची मरिन ड्राईव्हवर मस्ती:भारतात येताच देसी गर्ल पोहोचली तिच्या आवडत्या ठिकाणी, म्हणाली- मी तुला खूप मिस केले

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा जोनास तब्बल 3 वर्षांनी भारतात परतली आहे. ती मुंबईत आपला खास वेळ घालवत आहे, दरम्यान प्रियांकाने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तिने मुंबईतील मरीन ड्राइव्हला भेट दिली आणि येथे खूप धमाल केली. या व्हिडिओमध्ये प्रियांका व्हाइट कलरच्या ड्रेस आणि काळ्या सन ग्लासेसमध्ये खूपच स्टायलिश दिसत आहे. व्हिडिओमध्ये मस्ती करत ती वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोजही देताना दिसली. हा व्हिडिओ शेअर ती मुंबईला खूप मिस करत होती, असे तिने सांगितले. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये प्रियांकाने लिहिले, 'जुन्या अड्ड्यावर एक मिनिटं का होईना येऊन मजा आली. मुंबई मी तुला खूप मिस केले! आता कामावर परतायचे आहे.' या व्हिडिओला प्रियांकाने ‘से ना से ना’ या गाण्याचे रिमेक्स व्हर्जन जोडले आहे. हे गाणे 2005 मध्ये आलेल्या ब्लफमास्टर या चित्रपटातील असून ते प्रियांका आणि अभिषेक बच्चन यांच्यावर चित्रीत झाले होते. हा व्हिडिओ प्रियांकाच्या चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. पाहा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...