आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डिझायनरचा मोठा खुलासा:करीना-दीपिकाचा स्टायलिस्ट स्वप्निल शिंदेने केला 'ट्रान्सवुमन' असल्याचा खुलासा, नाव बदलून ठेवले 'सायशा शिंदे'

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फोटोत स्वप्निल सायशाच्या रुपात दिसतोय.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आणि दीपिका पदुकोणचा फॅशन डिझायनर स्वप्निल शिंदेने सोशल मीडियाद्वारे ट्रान्सवुमन असल्याचा मोठा खुलासा केला आहे. याशिवाय त्याने स्वतःचे नाव बदलून सायशा शिंदे असे ठेवले आहे. स्वप्निल शिंदेने नवीन वर्षात त्याचे नवे रुप जगासमोर आणले आहे.

स्वप्निल शिंदेनी स्वत:ची सर्जरी करुन स्त्री होण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात सोशल मीडियावर त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये स्वप्निलने त्याचा नव्या रुपातला फोटो शेअर करुन एक भावुक पोस्ट लिहिली आहे.

फोटोत स्वप्निल सायशाच्या रुपात दिसतोय. यासह तिने एक नोटदेखील शेअर केली आहे. ‘शाळा आणि कॉलेजमध्ये जेव्हा सगळी मुले मला माझ्या वागण्यावरून त्रास देत होते, तेव्हा माझ्या मनावर खूप आघात झाले. जे अस्तित्व माझे नाही ते जगताना मला गुदमरल्यासारखे होत होते. वयाच्या विसाव्या वर्षी NIFT दरम्यान, मी स्वतःचे सत्य स्वीकारण्याचे धाडस केले आणि तेव्हा खऱ्या अर्थाने मी मुक्त झाले. पुरुषांकडे आकर्षित होत असल्याने मी समलैंगिक आहे, असे सुरुवातीला मला वाटले. पण सहा वर्षांपूर्वी मी स्वत: पूर्णपणे स्वीकारले आणि आता मी समलैंगिक नाही तर ट्रान्सवुमन आहे’, असे सायशाने लिहिले आहे.

याचबरोबर ती पुढे म्हणते, ‘तुम्ही कितीही मोठे झालात तरी तुम्हाला तुमचे बालपण नेहमीच आठवत असते. माझ्या बालपणाच्या आठवणी फारच वाईट होत्या’, या शब्दांत तिने आपले दुःख व्यक्त केले. अखेर शस्त्रक्रियेचा आधार घेऊन स्वप्निलने ‘ट्रान्सवुमन’ होण्याचा निर्णय घेतला. कॅप्शनमध्ये, सायशा या नावाचा अर्थ स्पष्ट करताना लिहिले, "सायशा म्हणजे अर्थपूर्ण जीवन. माझे जीवन देखील अर्थपूर्ण बनवण्याची माझी योजना आहे," असे तिने म्हटले आहे.

बॉलिवूडचा पाठिंबा आणि प्रेम
सायशाने ट्रान्स वुमन असल्याचा खुलासा केल्यानंतर तिला इंडस्ट्रीतील तिच्या सहका-यांचे आणि बॉलिवूड सेलिब्रिटींचे सोशल मीडियावर प्रेम आणि पाठिंबा मिळत आहे. स्वप्निल शिंदे उर्फ ​​सायशाने करीना-दीपिकाशिवाय सनी लिओनी, किआरा अडवाणी, श्रद्धा कपूर, कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यासारख्या बॉलिवूड अभिनेत्रींसाठी डिझायनर म्हणून काम केले आहे.

बातम्या आणखी आहेत...