आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • 'Dhamaka' Shot In 10 Days On Live Sets, Post Production Completed In Four Months; Now The Final Copy Of The Film Will Be Given To Netflix In The Next 15 Days.

अपकमिंग फिल्म:10 दिवसांत आटोपले कार्तिकच्या 'धमाका’चे शूटिंग,  4 महिने सुरु होते पोस्ट प्रॉडक्शनचे काम; पुढील 15 दिवसांत नेटफ्लिक्सला दिली जाणार फायनल कॉपी

अमित कर्ण4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • व्हीएफएक्स आणि संगीत निर्मितीवर केला खास खर्च

कार्तिक आर्यनच्या आगामी ‘धमाका’ चित्रपटात संगीत विशेष प्रयोग करण्यात आले आहेत. या चित्रपटाचे शूटिंग फक्त 10 दिवसांत पूर्ण करण्यात आले. त्यानंतर त्याचे संपादन, व्हीएफएक्स वर्क आणि साउंड क्रिएशनमध्ये 4 महिने लागले. चित्रपटाचे साउंड डिझायनर मानस चौधरीने सांगितले, पुढच्या 15 दिवसांत चित्रपटाची फायनल काॅपी नेटफ्लिक्सला दिली जाईल. यानंतर पोस्ट प्रॉडक्शनच्या कामावर इंडस्ट्रीतील 4 मोठ्या कंपन्या मिळून करत आहेत. हा चित्रपट 2013 मध्ये रिलीज झालेल्या साऊथ कोरियन ‘द टेरर लाइव्ह’चा रिमेक आहे.

व्हीएफएक्स आणि संगीत निर्मितीवर केला खास खर्च
मानसने पुढे सांगितले, हा एक संगीतप्रधान चित्रपट आहे. यातील उत्कृष्ट संगीतासाठी ४ कंपन्या हायर करण्यात आल्या आणि मोठ्या पातळीवर जास्त वेळ देऊन उत्कृष्ट काम करण्यात आले. वर्ली सी लिंकच्या दृश्यासाठी सेटवर ग्रीन स्क्रीनचा वापर करण्यात आला. कारण लाइव्ह लोकेशनवर ते शूट झाले नव्हते. त्यानंतर स्टुडिओमध्ये तो पूल पडण्याचे दृश्य रिक्रिएट करण्यात आले. त्यानंतर इमारतींमध्ये स्फोटाचा आवाज ग्राफिक्सने तयार केला गेला. त्यांनतर पूल पडणे, पाणी वाहणे, लाटांचा आवाज सर्व काही क्रिएट करण्यात आले. त्या व्यतिरिक्त आणखी काही वस्तुचा आवाजदेखील क्रिएट केला गेला.

न्यूज अँकरच्या भूमिकेत कार्तिक आर्यन

चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर याची कथा न्यूज अँकर बनलेल्या कार्तिक आर्यनवर आधारित आहे. यात अमृता सुभाष त्याची बॉस आहे, तर मृणाल ठाकूर त्याची सहकारी न्यूज रिपोर्टरच्या भूमिकेत आहे. पहिल्यांदाच कार्तिक आणि मृणाल एखाद्या चित्रपटात एकत्र काम करत आहेत. सध्या मृणाल ईशान खट्टसोबत 'पिप्पा’मध्ये व्यग्र आहे. पंजाबमध्ये दोन दिवसानंतर याचे शूटिंग सुरू होणार आहे. आदित्य रॉय कपूरसोबतही तिचा एक रिमेक येणार आहे.

अशा प्रकारे झाले 10 दिवसांत शूट

  • चित्रपटाचे शूटिंग एकाच लोकेशनवर होणार होते, त्यामुळे निर्मात्यांनी सर्वांचे काम आधीच वाटून पूर्ण दहा दिवसांचे शूट चार्ट तयार केले.
  • कार्तिक आर्यन, मृणाल ठाकूर आणि अमृता सुभाषने मल्टी कॅमेरा सेटअपमध्ये काम केले. या सेटअपमध्ये वेगवेगळ्या अँगल्स कॅमेरा सतत फिरत राहिला. त्याला कुठेच थांबवले नाही.
  • कॅमऱ्याच्या समोर कलाकारांचे सिंगल टेक घेतले.
  • निर्मात्यांनी स्टुडिओमध्येही 20 ते 25 मायक्रोफोन लावले होते, जेणेकरून आवाज चांगल्या प्रकारे कॅच केला जाऊ शकेल.

बातम्या आणखी आहेत...