आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनश्री वर्माने शेअर केला नवीन व्हिडिओ:दुखापतीपासून ते शस्त्रक्रियेपर्यंतचा प्रवास केला शेअर, म्हणाली- मी चॅम्पियन आहे

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माने 7 सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. व्हिडिओमध्ये तिने दुखापतीपासून शस्त्रक्रियेपर्यंतचा तिचा प्रवास दाखवला आहे. धनश्रीच्या एसीएल लिगामेंटला डान्स सेशनदरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. हा व्हिडिओ शेअर करत तिने लिहिले की, ती चॅम्पियन आहे आणि बरी झाल्यानंतर लवकरच परतणार आहे.

या व्हिडिओमध्ये धनश्रीने डान्स रिहर्सल दरम्यान तिला कशी दुखापत झाली हे दाखवले आहे. दुखापतीमुळे, तिच्या सुजलेल्या गुडघ्यावर फिजिओथेरपी आणि शस्त्रक्रिया करावी लागली. याशिवाय व्हिडिओमध्ये धनश्री वॉकरच्या सहाय्याने चालताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये धनश्रीचा अतिशय स्ट्राँग आणि पॉझिटिव्ह अॅटिट्यूड दिसतोय. व्हिडिओसोबत धनश्रीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'मी चॅम्पियन आहे आणि तुम्ही मला सिंहापेक्षा जास्त गर्जना करताना ऐकाल. एकटे लढण्यासाठी मजबूत व्हा. कठीण काळ येतो आणि जातो, परंतु आपल्या सभोवतालची परिस्थिती समजून घ्या आणि प्रत्येक अनुभवातून शिका. मला थोडा वेळ लागला पण आता मी तयार आहे,' असे धनश्री म्हणाली आहे. बघा व्हिडिओ -

बातम्या आणखी आहेत...